विमा कंपनीवाले शिवसेनेचे जावई आहेत का ?

महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे विमा कंपनीला आपले जावई असल्यासारखे वागणूक का देत आहेत?
Bjp Mla Ranajagjeet singh paitl- Farmer Crop Insurance News Osmanabad
Bjp Mla Ranajagjeet singh paitl- Farmer Crop Insurance News Osmanabad

उस्मानाबाद: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पावसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पन्नास टक्यांपेक्षा अधिकची घट उत्पनात होण्याची शक्यता वर्तवली जात असतांना विमाकंपन्या मात्र हे मानायला तयार नाहीत. (Are the insurance companies Shiv Sena's son-in-law? Bjp Mla Ranajagjitsinha Patil tuljapur) राज्याचे कृषीमंत्री देखील पीक विमा कंपन्यावाल्यांनाच पाठीशी घालत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे.

शेतकरी अडचणीत सापडलेला असतांना त्यांना मदत करण्याऐवजी विमाकंपन्या मनमानी करत आहेत,  नुकसानीच्या अहवालावर सह्या करण्यास नकार देत आहेत. (Crpo Inusurance Company) असे असतांना या पीकविमा कंपन्यांवर कारवाई केली जात नाही, हे विमा कंपनीवाले शिवसेनेचे जावई आहेत का? असा संतप्त सवाल देखील राणापाटील यांनी सोशल मिडियावरील पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

जिल्ह्यात पावसामध्ये २२ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Agricultuer Minister Dada Bhuse, Shivsena) हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पन्ना मध्ये ५० टक्के पेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादे पर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये आहे.

पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना अनुज्ञेय २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची मागणी आपण केली होती. कृषी खात्याचे सचिव एकनाथ डवले व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या अनुषंगाने आदेश निर्गमित केले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह कृषी विभागाने चाचणी प्रयोग केले व ५०% पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे हा निष्कर्ष काढला.  

२० आॅगस्ट  रोजी अहवाल देणे अपेक्षित असताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून अहवालावर सह्या करण्यास नकार दिला. ही गंभीर बाब कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या निदर्शनास आणून कार्यवाहीची मागणीही केली. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ३०%  नुकसान झाल्याचे लेखी दिल्याचे समजते.

नमुना सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या विमा कंपनी प्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेतली असता ७०% पेक्षा जास्त प्रतिनिधी यांचा कृषी अभ्यासक्रमाशी कुठलाही संबंध नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

विमा कंपन्यांचे प्रतिनिधी तज्ञ आहेत?

कृषी विभागाच्या अनुभवी अधिकाऱ्यांपेक्षा हे प्रतिनिधींनी या क्षेत्रात तज्ञ आहेत का?अग्रिम नुकसान भरपाई तातडीने मिळावी ही बाधित चिंताग्रस्त शेतकऱ्यांची मागणी असताना महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे विमा कंपनीला आपले जावई असल्यासारखे वागणूक का देत आहेत?

खरीप २०२० चा हक्काचा पीकविमा देखील अशा वर्तनामुळेच प्रलंबित आहे. कळंब तालुक्यातील शेतकरी कै.अशोक राजेंद्र गुंड यांनी पावसातील खंडामुळे सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सोशल मिडीयाद्वारे मागणी केली होती व नुकसानीच्या नैराश्यातुन त्यांनी आपल्या जीवनाचा अंत केला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी आगाऊ रक्कम देऊन दिलासा देणे गरजेचे आहे.

त्यामुळे कृषी मंत्र्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी व नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम तात्काळ वितरीत करावी अन्यथा असंतोषाने उदभवणाऱ्या परिस्थीतीमुळे होणाऱ्या परिणामास शिवसेनेचे कृषी मंत्री सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा राणापाटील यांनी दिला आहे.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com