बीड जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची आता चेकपोस्टवर अॅन्टीजन टेस्ट

बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही.
minister dhnanjay munde meeting news Beed
minister dhnanjay munde meeting news Beed

बीड :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा. यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना देतांनाच  नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, असे आदेशही त्यांनी दिले.  

कोरोना आणि लसीकरणा बाबत आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. आमदार संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे , प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

जिल्ह्यातील आरोग्य व प्रशासन यंत्रणांनी तिसऱ्या लाटेच्या धोक्यासाठी सज्ज राहावे. जिल्ह्यातील पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, औषधी, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता व सुसज्जता ठेवा.  जिल्ह्यात आठवड्याला १० हजार लस उपलब्ध होत आहेत.

जिल्ह्याची क्षमता प्रतिदिन १ लाख लसीकरणाची असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडला लसींचे डोस कमी मिळत आहेत, ते वाढवण्याची गरज असल्याचे सांगत मुंडे यांनी बैठकीतूनच राज्याच्या आरोग्य संचालकांना फोन केला. डॉ. अर्चना पाटील यांनी ऑगस्ट महिन्यापासून बीड जिल्ह्यात लसींचा तुटवडा भासणार नाही, असे आश्वसन यावेळी दिले.

आॅक्सीजन निर्मितीची क्षमता वाढवा..

आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य व सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो याचा विचार करून पुढील काळात जवळ असलेल्या चौसाळा, राजुरी, चार्हाठा येथे कोरोना उपचारांसाठी ऑक्सीजन बेड असलेले कोविड सेंटर सुसज्ज केले जावे. जिल्हा रुग्णालयातील सिंगल स्लाईस सिटीस्कॅन यंत्रणाचे रूपांतर अत्याधुनिक केले जावे, ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याची मागणी केली.

तर बाळासाहेब आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सीजन बेडची आवश्यकता असून आष्टी येथे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तातडीने व्हावा, आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता व्हावी, असे सांगितले. बीड जिल्ह्यातील जवळपास सात लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यापैकी दुसरा डोस दिलेले पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या १ लाख ६३ हजार आहे.

आज  जिल्ह्यात२६३, व्हेंटिलेटर २०८ बायोपॅप मशीन आणि १०२० कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत.  तसेच संभाव्य लाटेच्या दृष्टीने लहान मुलांसाठी एनआयसीयूसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतही मुंडे यांनी  संबंधितांना सूचना दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com