हर्षवर्धन जाधव यांचा आणखी एक व्हिडिओ, रावसाहेब दानवेंवर खळबळजनक आरोप..

रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत, मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन, आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे.
harshvardhan jadhav allegation raovsaheb danve news
harshvardhan jadhav allegation raovsaheb danve news

औंरगाबादः हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. तसेच पत्नी संजना जाधव या आपल्या राजकीय उत्तराधिकारी असतील असे घोषित करत एकच खळबळ उडवून दिली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच हर्षवर्धन जाधव यांनी आज आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल करत सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला त्रास दिला तर मी आत्महत्या करीन, अशी थेट धमकीच जाधव यांनी दिली आहे.

कन्नड-सोयगावचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. परंतु तीन दिवसांपुर्वी हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत राजकीय संन्यासाची घोषणा करत पत्नीला उत्तराधिकारी ठरवले होते. आदरणीय रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्नी संजना कन्नड मतदारसंघात चांगल काम करतील, माझाही त्यांना पाठिंबा असेल असे सांगत कौटुंबिक वादावर पडदा टाकला होता. मात्र आज पुन्हा हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. 

रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत, मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी जीव देईन, आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे. या शिवाय त्यांनी कुटुंबातील अनेक गोष्टी चव्हाट्यावर आणत रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com