पंढरपूरची वारी, गणेशोत्सव, बकरी ईदला परवानगी द्या; धार्मिक भावनांचा आदर करा.. - Allow Pandharpur Wari, Ganeshotsav, Goat Eid; Respect religious sentiments. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

पंढरपूरची वारी, गणेशोत्सव, बकरी ईदला परवानगी द्या; धार्मिक भावनांचा आदर करा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

महाराष्ट्रातील गणेशमुर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी संपुर्ण वर्षभर गणेश उत्सवावरच अवलंबुन असतात.

औरंगाबाद : एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जाण्याऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला, गणेश उत्सव तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी द्या. (Allow Pandharpur Wari, Ganeshotsav, Goat Eid; Respect religious sentiments.) महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करुन सहकार्य करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट मोठे होते, त्यामुळे सर्वच धर्माच्या भाविकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि सरकारला सर्वोत्तपरी सहकार्य केले होते. (AIMIM Mp Imtiaz Jalil letter to CM Uddhav Thackeray) आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक परंपरेत खंड पडू नये म्हणुन शासनानेही सहकार्याची भुमिका घेणे आवश्यक आहे.  अजूनही धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

त्यामुळे सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.  गेल्या अनेक वर्षापासुनची पायी वारी, दिंडी आणि पालख्यांची पंरपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडीत होत आहे.  शेतकरी, ग्रामीण भागातील नागरीक आणि वारकरी दरवर्षी या धार्मिक सोहळ्यात लोखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. त्यांना पायी वारी काढू न देता, छळ करणे आणि कायदेशिर कार्यवाही करुन अटक करण्याचा प्रकार निंदनीय  आहे, असेही इम्तियाज जलील यांनी पत्रात नमूद केले आहे.

अर्थव्यवस्थेला मदतच होईल..

गणेश उत्सव हा देखील महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असुन त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.  महाराष्ट्रातील गणेशमुर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी संपुर्ण वर्षभर गणेश उत्सवावरच अवलंबुन असतात.  शिवाय गणेश भक्त देखील या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे यंदा  गणेश भक्तांना हा उत्सव उत्साहात व परंपरेनुसार साजरा करण्याची परवानगी दिल्यास त्यांचा आनंद व्दिगुणीत होईल.

तसेच छोट्या व्यापाऱ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम सार्थक लागतील.  यातून होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुध्दा होणार आहे, याकडेही इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. बकरी ईद हा सण देखील मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचा असतो.  या निमित्ताने अनेक छोटे-छोटे व्यापारी, शेतकरी व त्यावर अवलंबुन असलेल्या अनेकजण आपले व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असतात, त्यांना देखील दिलासा देण्याच्या दृष्टीने वरील मागण्यांचा सकारात्मक विचार करून परवानगी द्यावी, अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे.

हे ही वाचा ः भाजप विधानसभेत गुंडगिरी, मारामारी करतो आहे..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख