सर्वधर्मियांनी सण घरातच साजरे केले, रमजान देखील साधेपणानेच साजरा करा..

कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.
Minister Abdul Sattar Appeal Muslim Community For Ramdan News
Minister Abdul Sattar Appeal Muslim Community For Ramdan News

सिल्लोड ः मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान अर्थात ईद- ऊल- फित्रचा सण  जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव पाहता साध्या पध्दतीने आणि घरगुती वातावरणात साजरा करावा, (All religions celebrated their festivals at home, celebrate Ramadan with simplicity, Said Minister Abdul Sattar) असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. रमजानचा सण शेवटच्या टप्प्यात आहे.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघ व राज्यातील मुस्लिम समाज बांधवांना कोरोना काळात योग्य काळजी घेत रमजान साजरा करण्याचे आवाहन केले आहे. (For the second year in a row, Ramadan has to be celebrated in a simple manner due to the Corona crisis) कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी रमजान साध्या पद्धतीने साजरा करावा लागत आहे.

संपूर्ण महिनाभर ठेवलेले रोजे रमजान ईदच्या दिवशी सोडले जातात. आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वजण प्रयत्नशील आहेत. कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. याला रमजान सणही अपवाद नाही.

यापूर्वीही मुस्लिम बांधवांनी रमजान ईदसह विविध सण साधेपणाने आणि घरगुती वातावरणात साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले आहे. (Even before this, the Muslim Brotherhood cooperated with the district administration.)रमजान महिन्यात सार्वजनिकरीत्या नमाज अदा केली जाते.  इफ्तारसाठी लोक एकत्र येतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार रमजानचा सण साध्या पध्दतीने आणि घरगुती पध्दतीने साजरा करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह, इफ्तारसाठी मशीद, ईदगाह, सार्वजनिक मोकळ्या ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. 

सार्वजनिक ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. (Don’t rush to the market to buy.) बाजारात  खरेदीसाठी गर्दी करू नये. जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी घालून दिलेल्या वेळेचे बंधन पाळावे.

विनाकारण गर्दी करू नये किंवा रस्त्यावर फिरू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन पध्दतीने करावे, असे आवाहन देखील सत्तार यांनी केले आहे.

Edited by : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com