अजित पवारांचा फोन, अन् दुर्राणी यांचे अध्यक्ष पदाचे स्वप्न भंगले

माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अजित पवारांचा हा संदेश राजेश विटेकर व आमदार राजू नवघरे यांना सांगितला. दोघांनी तो आदेश मान्य केला.
Ajeet Pawar Phone call- Ncp Mla Babajani Durani News Parbhani
Ajeet Pawar Phone call- Ncp Mla Babajani Durani News Parbhani

परभणी ः अध्यक्षपद मिळावे यासाठी वेगळी भुमिका जाहीर करणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना ऐनवेळी पक्षश्रेष्टींच्या आदेशाचे पालन करावे लागले. महाविकास आघाडीसोबत रहा, असा संदेश वरूनच आल्याने आमदार बाबाजानी यांचे जिल्हा बॅकेचे अध्यक्षपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीत १० जागा जिंकत कॉग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर गटाने वर्चस्व सिध्द केले. प्रतिस्पर्धी भाजप  नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडे ९ जागा होत्या. स्थानिक उमेदवारांना डावलेले जात असल्याचे कारण समोर करून राष्ट्रवादीचे दुर्राणी यांनी ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत वरपुडकर गट सोडून बोर्डीकरांच्या तंबूत उडी मारली होती.

बाबाजानी दुर्राणी बोर्डीकर गटाकडे गेल्याने बोर्डीकरांचे पारडे जड झाले असे बोलले जात होते. संपूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमात दुर्राणी हे बोर्डीकर गटा सोबतच होते. परंतू जसा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याचवेळी दुर्राणी यांनी `आम्हाला कुणीही गृहित धरू नये`, असे म्हणत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत आणली होती. 

त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर, दत्तात्रय मायंदळे व स्वतः दुर्राणी हे वेगळे राहतील असा अंदाज बांधला जात होता. परंतू ऐन अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान, पक्षाचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून वरपुडकर गटासोबतच रहा, असा आदेश दिला आणि दुर्राणी यांच्यसह राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या संचालकांचा हिरमोड झाला.

बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतू दोन्ही पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर वरपुडकर गटाच्या पाठीशी रहावे, असा निर्णय पक्षश्रेष्ठीकडून आल्याने आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अडचण वाढली. माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अजित पवारांचा हा संदेश राजेश विटेकर व आमदार राजू नवघरे यांना सांगितला. दोघांनी तो आदेश मान्य केला. त्यामुळे नाराज झालेले दुर्राणी  निवडणुक प्रक्रिया सोडून थेट पाथरीकडे रवाना झाले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com