Minister Ajit Pawar meeting In Beed News
Minister Ajit Pawar meeting In Beed News

पीक कर्ज वाटपासाठी बॅंकांना अजित पवारांनी दिली १५ जुलैची डेडलाईन..

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्ज वाटपाचा टक्का यावर्षी वाढवला असल्याबाबत त्यांनीसमाधान व्यक्त केले.

बीड ः कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासन संपूर्ण ताकदीनिशी जिल्ह्याच्या पाठीशी असून जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांच्या सहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशा सूचना अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिल्या. (Ajit Pawar gives July 15 deadline to banks for disbursement of peak loans.) तसेच शेतकऱ्यांना येत्या १५ जुलैपर्यंत राज्यातील सर्व बॅंकांनी पीक कर्जाचे वाटप करावे, असेही पवारांनी ठणकावून सांगितले. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण काहीसे चिंताजनक आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar) या पार्श्वभूमीवर तातडीने जिल्ह्याचा दौरा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. (Health Minister Rajesh Tope) या बैठकीस राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री  राजेश टोपे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

ॲम्ब्युलन्स मागणीचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या तसेच म्युकरमायकोसिस आजारावरील यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अजित पवारांनी  राज्याचे आरोग्य आयुक्त रामस्वामी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून दिल्या.  यावेळी रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यता अधिकार जिल्हास्तरावर देण्याचा निर्णय आजच्या आज आरोग्य विभागाने करावा, असे ते म्हणाले.

खरीप हंगामाच्या दृष्टीनेही या बैठकीत आढावा घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील पीक विमा पॅटर्नची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सोयाबीन, कापूस ,तुर आदी बियाणांच्या उपलब्धतेबाबत अजित पवारांनी माहिती घेतली.

महाबीजकडून उपलब्ध होणारे बियाणे मर्यादित आहे, परंतु राज्य शासन इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. खतांची पुरेशी उपलब्धता असून पीक कर्ज वाटपासाठी बँकांना १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्ज वाटपाचा टक्का यावर्षी वाढवला असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच इतर सर्व बँकांनी १५ जुलैच्या आत कर्ज वाटप करण्याचे ठरवून दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला त्याचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

टोपेंनी यंत्रणेचे केले कौतुक..

बीड जिल्हा आरोग्य विभागाने दोन्ही लाटेत युद्धपातळीवर काम केले, जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेट आजही विभागात अव्वल आहे.  जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून त्या दृष्टीने तयारी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील दिले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com