अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला, की मी पण राष्ट्रवादीत जाणार..

गोरठेकर हे मुळचे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच त्यांचे वडील हे देखील शंकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक असले तरी शरद पवारांना मानत होते.
Mla shaymsunder shinde-Ncp news Nanded
Mla shaymsunder shinde-Ncp news Nanded

नांदेड ः लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, मतदारसंघात विकासकामे करायची असतील तर विचार करावाच लागतो, नुसती भंपकबाजी, पोस्टरबाजी करून चालत नाही. त्यामुळे माझी राष्ट्रवादीत जाण्याची मानसिकता झाली आहे. (Ajit Pawar gave the green signal that I will also join the NCP.) आता अजितदादांचा ग्रीन सिग्नल मिळाला, की मी ही राष्ट्रवादीत जाईन, असे कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी `सरकरनामा`शी बोलतांना सांगतिले.

भाजपमध्ये गेलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी कालच मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली. यावेळी श्यामसुंदर शिंदे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. (Shetkari Kamgar Paksh Mla Shaymsunder Shinde, Kandhar-Loha-Nanded) ते देखील राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नांदेड दौऱ्यापासून सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी आपली राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

आमदार श्यामसुंदर शिंदे हे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे भावजी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी चिखलीकर यांनीच गोरठेकर यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणले होते. (Ncp Leader Ajit Pawar Maharashtra) एवढेच नाही तर त्यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारीही मिळवून दिली. पण गोरठेकर यांचा काॅंग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्या समोर टिकाव लागला नाही,आणि चिखलीकरांचा गेम फसला.

तेव्हापासून अडगळीत असलेल्या गोरठेकर यांच्या मनाची घालमेल लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा आणण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात बोलतांना शिंदे म्हणाले, गोरठेकर हे सज्जन आणि प्रमाणिक आहेत, मध्यंतरी ते भरकटले होते. पण जनतेच्या मनावर अधिराज्य करायचे असेल तर त्यांची कामे करावी लागतात, संकटात त्यांच्या मदतीला धावून जावे लागते. पण जिल्ह्यातील काही नेते नुसती बॅनरबाजी, भंपकबाजी आणि बोलघेवडेपणा यावरच आपली राजकीय पोळी भाजून घेतात.

गोरठेकर हे मुळचे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच त्यांचे वडील हे देखील शंकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक असले तरी शरद पवारांना मानत होते. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले बापूसाहेब गोरठेकर हे देखील शरद पवारांच्या विचारांवरच चालत होते. परंतु काही लोकांनी त्यांची दिशाभूल केली आणि त्यांनी वेगळा मार्ग निवडला होता.

पण त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केल्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, नेते अजित पवार यांच्यांशी चर्चा करून त्यांना गोरठेकरांची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा या दोन्ही नेत्यांना त्यांच्या घरवापसीला हिरवा कंदील दाखवला. सध्या कुठलेही पद मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले, पण गोरठेकरांनी कुठल्याही पदाची आशा न बाळगता राष्ट्रवादीत परतण्याची तयारी दाखवली आणि काल हा प्रेवश मुंबईत झाला. 

माझा निर्णयही लवकरच..

जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्यावेळी तुम्ही राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती? मग तुमचा प्रवेश कधी होणार असे विचारले असता, शिंदे म्हणाले, जयंत पाटील आणि माझे कौंटुबिक संबंध आहेत, त्यामुळेच नांदेड दौऱ्यात मी त्यांच्यासोबत होतो.  राहिला प्रश्न राष्ट्रवादीत जाण्याचा तर मी मन बनवले आहे. आता अजित पवारांनी परवानगी दिली, की मी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

शेवटी लोकांची कामे करायची असेल तर चांगल्या पक्षात जावेच लागेल. राष्ट्रवादीत गेल्याने मला लोकांची कामे, त्यांचे प्रश्न, अडचणी सोडवता येतील, असेही ते म्हणाले. गोरठेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाचा फायदा होऊन जागा वाढतील, असा दावा देखील शिंदे यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com