अजित पवार व इतर मराठा मंत्री आरक्षणावर बोलत नाहीत; त्यांच्या तोंडात गुटखा, खैनी आहे का?

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर अद्यापही सरकारने फेरयाचिका दखल केली नाही.
Ex Mla Narendra Patil Press News Beed
Ex Mla Narendra Patil Press News Beed

बीड : समाजाला मिळालेले आरक्षण मराठा समाजाच्या ५८ मुकमोर्चांचे यश होते. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समाजाचे आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांनी राग व्यक्त केला. (Ajit Pawar and other Maratha ministers are not talking about reservation; Do they have gutkha, khaini in their mouth?) पण अजित पवार, व इतर मराठ मंत्री आरक्षणावर बोलत नाहीत, त्यांच्या तोंडात गुटखा, खैनी आहे का? असा टोला माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

पाच जुनला होत असलेल्या मोर्चाबाबत  पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली. पाटील म्हणाले, आरक्षणामुळे समाजाची अनेक मुले स्पर्धा, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात गेले. आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मेटेंसह अनेकांची शिष्टमंडळे सरकरला भेटले पण त्यांनी गांभीर्य दाखविलेच नाही.

तत्कालिन महायुती सरकारने आरक्षणासोबतच समाजाला दिलेल्या समांतर योजना आणि सवलतीही या सरकारने दोन वर्षांत हळुहळु कटकारस्थान करुन बंद केल्या.(Maratha Revolution Struggle Mocha; The salt of this movement of fight reservation will reach all over the state) आता आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकारातून पाच जुनला होत असलेल्या मराठा क्रांती संघर्ष मोचा; लढा आरक्षणाचा या आंदोलनाचे लोण राज्यभर पोचेल, असा विश्वास

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर अद्यापही सरकारने फेरयाचिका दखल केली नाही. त्यामुळे या मोर्चातून सरकार विरोधातील असंतोष दिसणार आहे. हा मोर्चा राज्याला दिशा देणार आहे. (The protest will show dissatisfaction with the government.) दरम्यान, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या योजना, सोयी, सवलती देणार हे सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, आरक्षणाची ठिणगी राज्यभर पसरेल, असे विनायक मेटे म्हणाले.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळातील ओबीसी मंत्री आक्रमक झाले आहेत. सरकारला धारेवर धरत आहेत. याच वेळी मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांसह इतर मराठा मंत्री काहीच का बोलत नाहीत. त्यांच्या तोंडात गुटखा आहे की खैनी कळत नाही, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी लगावला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com