वचक नसल्याने कृषी मंत्र्यांना खतासाठी दारोदार फिरावे लागते..

भाजप सरकारच्या काळात कुठेही खत, बी-बियाणांचा तुटवडा जाणवत नव्हता. पण महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर वचकच नसल्याने कृषीमंत्र्यांनाच खतासाठी दारोदार फिरावे लागत आहे, दुकांनावर धाडी टाकाव्या लागत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी देखील मंत्र्यांना चुकीची माहिती देतात.
bjp protest agianst mahavikas aghadi sarkar news
bjp protest agianst mahavikas aghadi sarkar news

औरंगाबादः राज्य सरकारचा प्रशानावर वचक नाही, म्हणूनच कृषी मंत्र्यांनाच खतासाठी दारोदार फिरावे लागत आहे, दुकानांवर धाडी टाकाव्या लागत आहेत. पाऊस पडला, पेरण्या सुरू झाल्या, तरी शेतकऱ्यांना खत आणि पीक कर्ज मिळत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. सत्तेवर येण्यापुर्वी मोठ्या गप्पा मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पुर्ण करता आली नाहीत, अशी टिका करत भाजपने आज स्टेट बॅंक आॅफ इंडिया समोर निदर्शने केली.

शेतकऱ्यांना खरीप हंगाम सुरू झाला, तरी बॅंकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याच्या निषेधार्थ व मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने शहरातील शासकीय दुध डेअरी चौकातील एसबीआय शाखेच्या समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते भाजपचे माजी उपमहापौर भगवान घडामोडे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

भाजप सरकारच्या काळात कुठेही खत, बी-बियाणांचा तुटवडा जाणवत नव्हता. पण महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनावर वचकच नसल्याने कृषीमंत्र्यांनाच खतासाठी दारोदार फिरावे लागत आहे, दुकांनावर धाडी टाकाव्या लागत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी देखील मंत्र्यांना चुकीची माहिती देतात.

सत्तेवर येण्याआधी  शेतकऱ्यांना मोठी आश्वासन सरकारकडून दिली गेली होती. पण प्रत्यक्षात ती पुर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. म्हणून शेतकऱ्यांना बांधावर खत, बी- बियाणे आणि खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पीक कर्ज मिळाले पाहिजे यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत आहे.

शेतकरी कर्जमाफी केल्याचे सरकारकडून सांगितले गेले, प्रत्यक्षात लाखो शेतकरी अजूनही यापासून वंचित आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती, पण ती देखील हवेत विरली.

त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बॅंका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत, सरकारकडून कुठलीही पावले उचलली जात नाहीत. केवळ गप्पा मारून आम्ही शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी सरकारवर केला.

शेतकऱ्यांना अजूनही खत मिळत नाहीये, आणि सरकार बांधावर खत दिल्याचा दावा करतयं. मग कृषी मंत्र्यांना दारोदार का फिरावे लागत आहे? सरकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, कृषी मंत्र्यांना येऊन धाड टाकावी लागते, मग कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन काय करते? असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com