parbhnai mp jadhav protest against medical college news
parbhnai mp jadhav protest against medical college news

मेडिकल काॅलेजसाठीचे आंदोलन संपले; भाजप म्हणते नौटंकी संपली..

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात नाही, हा परभणीकरांवर अन्याय आहे.

परभणी ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करावे या मागणीसाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची चौथ्या दिवशी रविवारी (ता.पाच) सांगता करण्यात आली. तसेच मंगळवार (ता.सात) पासून खासदार संजय जाधव उपोषणास बसणार होते. परंतू ते उपोषणही सर्वपक्षीय नेत्यांच्या सल्ल्यावरून पुढे ढकलण्यात आले. परंतू आंदोलनाची सांगता करताच परत खासदार जाधव यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली  १ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी, शेतमजूर, हमाल- मापाडी, इतर मजूर, ऑटोरिक्षाचालक तथा अन्य वाहनचालकांनी आपली एकजूट दाखवत धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला.

आंदोलनकर्त्यांनी 'परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे', 'वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे', अशा घोषणा देऊन आंदोलन स्थळाचा परिसर दणाणून सोडला.  आंदोलनाची सांगता करण्याची घोषणा झाल्यानंतर लगेच भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी खासदार संजय जाधव यांना निशाना साधत 'सत्ताधाऱ्यांची नौटंकी आटोपली' असा आरोप केला.

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात नाही, हा परभणीकरांवर अन्याय आहे. वैद्यकीय महाविद्यालय मिळविण्यासाठी आम्ही परभणीकर यांची लढाई  सुरूच राहणार आहे. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्या जनतेसाठी कुठेही आणि काहीही करायची तयारी आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या सांगण्यावरून ता. सात सप्टेंबरपासून करण्यात येणारे प्राणांतिक उपोषण काही दिवसांसाठी पुढे ढकलत आहोत.
असे संजय जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

परभणीकरांची शुद्ध फसवणूक...

तर दोन दिवसांपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन म्हणजे तीघाडी सरकारमधील सत्ताधाऱ्यांची  नौटंकी असल्याचे म्हटले होते. तेच आज खरे  ठरले आहे. जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीला पीपीपीच पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना परभणी जिल्ह्याशी काही सोयरसुतक राहिलेले नाही. शासकीय महाविद्यालयासाठी लागणारे आठशे कोटी रूपये आणायचे कुठून, असा प्रश्न शिष्टमंडळासमोर ऊपस्थित करून उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी या संदर्भातली आपली मानसीकता स्पष्ट केलेली आहे.

असे असताना सुरू असेलेले आंदोलन म्हणजे परभणीकरांची शुद्ध फसवणूक आहे.   मेडीकल कॉलेज परभणीला झालेच पाहिजे, ही प्रत्येक परभणीकरांची रास्त मागणी आहे. जन आंदोलन करण्यापेक्षा राज्य सरकार मधील जिल्ह्याच्या लोकप्रतिधींनी आपल्या पक्षांच्या सरकारकडे पाठपुरावा करावा. गरज पडेल तेंव्हा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची जवाबदारी आपण स्विकारत असल्याचे सांगत बोर्डीकर यांनी खासदार जाधव यांच्यावर टीका केली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com