महिनाभरानंतर फडणवीस-मुंडे समोरासमोर आले, पण ..

पक्षांतर्गत संघर्षाला महिना उलटल्यानंतर काल दिल्लीत देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे हे राज्यातील खासदारांच्या बैठकी निमित्ताने समोरासमोर आले.
Devendra Fadanvis-Pankaja Munde Delhi News
Devendra Fadanvis-Pankaja Munde Delhi News

औरंगाबाद ः मोदी सरकारमधील मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रात फडणवीस विरुद्ध मुंडे असा संघर्ष पहायला मिळाला. फडणवीस यांच्यामुळेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना पंकजा मुंडे व त्यांच्या समर्थकांमध्ये झाली. (After a month, Fadnavis-Munde came face to face, but) तसा या दोन नेत्यांमधील दरी ही परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा यांचा पराभव झाल्यानंतरच निर्माण झाली होती. 

पंकजा मुंडे यांनी त्यानंतर केलेल्या अनेक भाषणातून आपल्या पराभवात पक्षातीलच काही नेत्यांचा हात असल्याचा जाहीर आरोप केला होता. त्यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले नव्हते, मात्र त्यांचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात येत होते. (Bjp Leader Pankaja Munde, Maharashtra) पुढे विधान परिषद, राज्यसभा सदस्यांच्या निवडीवेळी देखील पंकजा यांना डावलून त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनुक्रमे रमेशअप्पा कराड आणि डाॅ. भागवत कराड यांना संधी दिली गेली. तेव्हा देखील या मागे फडणवीसच असल्याचा आरोप केला गेला.  

पंकजा मुंडे यांना भाजपने राष्ट्रीय सचिव करत देश पातळीवर काम करण्याची संधी दिली, अशी सावरासावर केली गेली. (Bjp Apposision Leader Devendra Fadanvis) पण या मागे देखील पंकजा मुंडे यांचे राज्यातील वर्चस्व कमी करण्यासाठीच त्यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आणि त्याचे सूत्रधार देखील फडणवीसच असल्याचा आरोप पंकजा समर्थकांकडून करण्यात आला. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असतांनाच महिनाभरापुर्वी झालेल्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का देण्यात आला. 

राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्यावरून मेळावे, मोर्चे सुरू असतांना बीडच्या खासदार आणि पंकजा यांच्या भगिनी डाॅ. प्रीतम मुंडे यांचा समावेश मंत्रीमंडळात केला जाईल, असे बोलले जात होते. पण इथेही वर्षभरापुर्वीच राज्यसभेवर गेलेल्या डाॅ. कराड यांची वर्णी लावण्यात आली. यानंतर मात्र पंकजा मुंडे समर्थकांचा संयम सुटला आणि बीड जिल्ह्यासह राज्यातून राजीनामा सत्र सुरू झाले. दरम्यान, पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर पंकजा मुंडे समर्थकांकडून आगपाखड केली गेली. 

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या भेटीनंतर मुंबईत पंकजा यांनी नाराज समर्थकांचा मेळावा घेतला. सगळ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर करत संघर्षांची तयारी दर्शवली. राज्यातील अनेक नेत्यांनी साथ दिल्याचे सांगताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख त्यांनी टाळला. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा हे आहेत, मी राष्ट्रीय स्तरावर काम करते असे सांगत त्यांनी राज्यातील नेतृत्वाला आपण मानत नसल्याचे दाखवून दिले होते. 

या पक्षांतर्गत संघर्षाला महिना उलटल्यानंतर काल दिल्लीत देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे हे राज्यातील खासदारांच्या बैठकी निमित्ताने समोरासमोर आले होते. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी देखील ते शेजारीच उभे होते. त्यानंतर दानवे यांच्या बंगल्यावरील पक्षाच्या बैठकीत व्यासपीठावरील त्यांच्यातील अंतर वाढले आणि पंकजा या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेजारी बसल्या.

राज्यातील हे दोन नेते समोरासमोर आले असले तरी त्यांच्यात फारसा संवाद झाल्याचे दिसले नाही. दोघांच्याही देह बोलीतून एकमेकांबद्दल असलेली नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.  दुसरीकडे मात्र दानवे यांच्यासोबत पकंजा मुंडे या हास्यविनोद करतांना दिसल्या.

कटुता कायम?

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, तोपर्यंत राज्यात निवडणूकाच होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाचे नेतृत्व आपल्याकडे घेतल्याची चर्चा सुरू होती. औरंगाबादेत त्यांनी या संदर्भात ठोस भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली. 

पण मुंबईत जेव्हा ओबीसी आरक्षणा संदर्भात परिषद झाली तेव्हा मात्र या परिषदेला पंकजा मुंडे यांना बोलावण्यात आले नव्हते. राज्यातील भाजपचे ओबीसी नेते, लोकप्रतिनी या बैठकीला हजर असतांना पुन्हा एकदा पंकजा यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.

तेव्हा भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने हा राज्यातील ओबीसी नेत्यांचा कार्यक्रम होता, पंकजा या राष्ट्रीय नेत्या असल्यामुळे त्यांना आमंत्रण नसेल असा टोला देखील लगावला होता. एकंदरित महिनाभरानंतर फडणवीस-मुंडे दिल्लीत आमने-सामने आले असले तरी या दोन्ही नेत्यांमधील कटुता मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com