मुख्यमंत्र्यांनंतर अशोक चव्हाण यांनीही मानले छत्रपती संभाजी राजेंचे आभार

शातंता राखा तुमचे जीव महत्वाचे आहे. जीव वाचले तर आरक्षणाचा लाभ घेता येईल, असेही छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते.
Minister Ashok Chavan Twitt For Mp Sambhaji Raje News Aurangabad
Minister Ashok Chavan Twitt For Mp Sambhaji Raje News Aurangabad

औरंगाबाद ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी विरुध्द भाजप असा संघर्ष पेटला आहे. मराठा संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कुठे रास्तारोको, तर कुठे आत्मक्लेश, मुंडण, निदर्शने असे वातावरण राज्यभरात आहे. मात्र अशा गंभीर प्रसंगी देखील (Minsiter Ashok Chavan Thanks to Bjp Mp Chatrapati Sambhajiraje)  भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि मराठा समाजाला केलेले आवाहन याबद्दल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

अशोक चव्हाण यांनी या संदर्भात एक ट्विट करून संभाजी राजे यांच्या भूमिकेचे स्वागत करतांनाच त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनपुर्वक आभार व्यक्त केले आहे. काल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही, ते रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने जाहीर केला. (Ashok Chavan Twitte For Thnaks) त्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्यातील मराठा नेते, संघटना या सगळ्यांनीच राज्य व केंद्र सरकाराला आरक्षण कायदा रद्द होण्यासाठी जबाबदार ठरवत आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला.

त्याचवेळी मात्र खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत मराठा समाज, संघटना व आंदोलकांना शांततेचे आवाहन केले होते. (Mp Sambhaji Raje Apeal to Maratha Community Fo peace)  निकाल विरोधात गेला असला तरी अन्य पर्यायांचा वापर करू, राज्य सरकारने आता पुढे काय करणार हे स्पष्ट करावे, असे सूचवत संभाजी राजे यांनी विशेषतः मराठा तरूणांना शांततेचे आवाहन केले होते.

राजेंची भूमिका महत्वाची..

कोरोना सारख्या संकटात उद्रेका सारखा शब्द देखील कुणाच्या तोंडी येऊ देऊ नका, शातंता राखा तुमचे जीव महत्वाचे आहे. जीव वाचले तर आरक्षणाचा लाभ घेता येईल, असेही छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. त्यामुळे काही अपवाद वगळता राज्यात कुठेही अनुचित प्रकार किंवा हिंसक घटना घडल्या नाही.

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी देखील काल रात्री केलेल्या आपल्या निवदेनात छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेचा खास उल्लेख केला होता. (CM Uddhav Thackeray Also Thanks to Sambhaji rajes Stand After Suprem Court Judgement About Marahta Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणा संदर्भातील निकालानंतर मराठा समाज, संघटना व तरुणांना संभाजी राजे यांनी केलेले आवाहन कौतुकास्पद होते, त्यांचे मी आभार मानतो असे ठाकरे यांनी आपल्या निवेदनाता म्हटले होते.

त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील संभाजी राजे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर मराठा नेते व संघटनांनी संताप व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच अशोक चव्हाण यांनी आज ट्विट करत छत्रपती संभाजी राजे यांच्या भुमिकेचे कौतुक करत त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.

मराठा आरक्षण लढ्यात खासदार संभाजी राजे यांनी नेहमीच सकारात्मक आणि राजकीय अभिनिवेष नसलेली भूमिका घेतली आहे. (Ashok Chavan Twitte) सामाजिक चळवळीत अशीच भूमिका ठेवून काम करणे गरजेचे असते. त्याशिवाय चळवळीला यश मिळू शकत नाही. खासदार युवराज संभाजी यांचे प्रयत्न आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, असे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com