ग्रामपंचायतीवरील प्रशासक महाविकास आघाडीच्या समन्वयातूनच ठरणार

महाविकास आघाडीच्या तीन पक्षातील ज्या पक्षाचे त्या गावामध्ये अधिक सदस्य असतील त्याना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व आमदार तसेच खासदार यांची समन्वय समिती तयार करण्यात येणार असून तेच खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचा प्रशासक ठरवणार आहेत.
grampanchyat  administrator appoint news
grampanchyat administrator appoint news

उस्मानाबादः राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पालकमंत्र्याच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या मार्फत ही निवड करण्यात यावी असे, शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षतीच्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळावी, यासाठी या तीन पक्षांचे जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार यांना विश्वासात घेऊनच प्रशासक पदाचे नाव निश्चित करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मुदती संपल्या असल्या तरी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या महापालिकांची मुदत संपली होती, तिथे शासनाने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. आता राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, अशा ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ठिकाणी गावातील योग्य व्यक्तीची निवड करून त्याच्यावर प्रशासक पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काही काळासाठी का होईना गावचा कारभार सांभाळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मुदत संपलेल्या संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करावे, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पण प्रशासक नेमण्या संदर्भात पालकमंत्र्याचा सल्ला घ्यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षातील ज्या पक्षाचे त्या गावामध्ये अधिक सदस्य असतील त्याना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व आमदार तसेच खासदार यांची समन्वय समिती तयार करण्यात येणार असून तेच खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचा प्रशासक ठरवणार आहेत.

गावातील एका व्यक्तीची निवड करताना एकमताने व्हावे याची जबाबदारी या समितीची असणार आहे. ज्या गावामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची सत्ता आहे, तिथे त्याच पक्षाचा व्यक्ती निवडला जाणार आहे. पण ज्या गावात विरोधी पक्षाची सत्ता असणार आहे, तिथे मात्र समन्वयाने एकाची निवड करण्याची प्रक्रीया होणार आहे. यामध्ये तीन्ही पक्षानी एकत्रितरित्या बसुन एका नावावर एकमत करावे, यानंतरही एकमत झाले नाही, तर ती नावे राज्यस्तरीय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीकडे पाठवण्यात येणार आहेत.

या निमित्ताने स्वच्छ प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षापासुन जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षासाठी झटत आहेत, पण जनतेतून निवडूण येण्याची संधी त्यांना मिळाली नाही, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे. कार्यक्षमता व प्रामाणिकपणे काम करण्याची जिद्द असणाऱ्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी, भविष्यात त्याच्यासाठी जिल्हा परिषद किंवा इतर निवडणुकीसाठीचा मार्ग ठरू शकेल. 

भाजपला फटका बसणार..

ग्रामपंचायत प्रशासक निवडीमध्ये भाजपला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ज्या ग्रामपंचायतीवर त्याचे वर्चस्व राहिलेले आहे, अशा ठिकाणची सत्ता देखील महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. महापालिकांसह मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे, अद्याप स्पष्ट नसल्यामुळे भाजपला हातात असलेल्या ग्रामपंचायती देखील गमवाव्या लागणार असे दिसते. 
 

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com