आदित्य ठाकरेंची शिफारस,अदानींचा पुढाकार; फ्रान्सच्या कंपनीचा औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प.. - Aditya Thackeray's recommendation, Adani's initiative; French company's biogas plant in Aurangabad. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

आदित्य ठाकरेंची शिफारस,अदानींचा पुढाकार; फ्रान्सच्या कंपनीचा औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प..

माधव इतबारे
बुधवार, 16 जून 2021

टोटल एनर्जीजच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेबद्दलची माहिती मागवली आहे.

औरंगाबाद ः जगातील सर्वात मोठी समजली जाणारी फ्रान्सची तेल कंपनी औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. १६) ऑनलाइन बैठक झाली. (Aditya Thackeray's recommendation, Adani's initiative; French company's biogas plant in Aurangabad.)  या कंपनीसाठी राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिफारस केली असून, प्रसिद्ध उद्योगपती आदानी यांनी पुढाकार घेतला आहे. 

टोटल एनर्जीज या कंपनीने व महापालिकेचे प्रशासक व औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासोबत बैठक घेतली. (Shivsena Minsiter Aditya Thackeray) यावेळी स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीजचे ज्युल डिओर, आदानी उद्योग समुहाच्या ग्रीन एनर्जी लिमीटेडचे प्रताप मोंगा, इनव्हेंस्ट इंडियाचे वेदांत राज उपस्थित होते.

बैठकीनंतर महापालिकेतर्फे सांगण्यात आले की, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जी या कंपनीने इव्हेंट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी संपर्क साधला. (Aurangabad Municipal Commissinor Astikkumar Pandey) बैठकीत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इंडो-फ्रेंच संबंधाची माहिती देण्यात आली.

पांडेय यांनी यावेळी सांगितले की, मराठवाड्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पशुधनही उपलब्ध आहे. तसेच विविध जिल्ह्यात चारा छावण्या सुरू केल्या जातात. त्यातून जैव ऊर्जा उत्पादनासाठी होऊ शकते.

प्रशासकांनी दिलेल्या माहितीनुसार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेले सादरीकरण यामुळे टोटल एनर्जीजच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेबद्दलची माहिती मागवली आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. कंपनीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा ः राम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणारे, दुर्दैवी बिचारे..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख