गंगापूर कारखाना प्रकरणातील आरोपी मोकाट, बंब यांच्याकडूनच फिर्यांदीवर दबाव, खोटे गुन्हे

गंगापूर सहकारी साखर कारखाना प्रकरणातील १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यांवर तीन महिन्यापूर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gangapur Sugar Factory- Mla Prashant Bamb- Shivsena Krishna Dongaonkar News
Gangapur Sugar Factory- Mla Prashant Bamb- Shivsena Krishna Dongaonkar News

औरंगाबाद ः गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या अपहार प्रकरणातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.  या प्रकरणातील सगळे आरोपी मोकाट फिरत आहेत. मुख्य आरोपी आमदार प्रशांत बंब हे फिर्यादीवर दबाव टाकून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद व माजी चेअरमन कृष्णा डोणगावकर यांनी केला. 

कृष्णा डोणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील पोलिस तपासाविरोधात नाराजी व्यक्त केली. गंगापूर सहकारी साखर कारखाना प्रकरणातील १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार  करणाऱ्यांवर तीन महिन्यापूर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तीन महिन्यानंतरही आरोपींना अटक झालेली नाही.

या उलट एका महिलेला अटक करून परत सोडून दिले, असा पोलिसांचा तपास सुरू असल्याने मुख्य आरोपी हे साक्षीदारांवर दबाव टाकून साक्ष बदलण्याचे काम करत असल्याचा आरोप डोणगावकर यांनी केला. श्रीमंत चाफे व संचालक डॉ. गौरक तुपलोढे यांचे बंधू भरत तूपलोढे यांनी माझ्यासह इतर साक्षीदारांवर दमदाटीचा गुन्हा दाखल केला आहे.

एवढेच नाही तर मी दोन कोटीची खंडणी मागितली म्हणून लासुर पोलिस ठाण्यात देखील माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आमदार प्रशांत बंब व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.

 माझ्या विरोधात केलेला हा गुन्हा खोटा असून यात माझ्यासह फिर्यादी व बंब यांची नार्को ॲनालेसीस टेस्ट करावी व गंगापूर सहकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना वाचवावा, अशी मागणीही डोणगावकर यांनी यावेळी केली. 

बंब यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार करणार 

गंगापूर तालुक्यातील सर्व बँका व इतर ठिकाणच्या बँकांतून  प्रशांत बंब यांनी खोटी कागदपत्र दाखवून कोटीचे कर्ज घेतले आहे. यामध्ये बंब यांचे हात खोलवर रुतले आहेत. याबाबतची तक्रार ईडीकडे (सक्तवसुली संचलनालय) दाखल करणार असल्याचे डोणगावकर यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारीही बंब यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी दिलीप बनकर, कामगार युनियनचे अध्यक्ष विठ्ठल कुंजर, शेतकरी संघटनेचे भाऊ पाटील शेळके यांची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com