अबू आझमींनी एमआयएममध्ये प्रवेश करावा, इम्तियाज जलील यांची आॅफर..

मै एमआयएम की तरफसे अबू आसिम भाई को मजलिस ज्वाइन करने की दावत देता हू. हम मिलकर युपीमे सभी जातीयवादी पार्टीयोका मुकाबला करेंगे.
AIMIM Offer Sp Mla Abu Azami News Aurangabad
AIMIM Offer Sp Mla Abu Azami News Aurangabad

औरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एमआयएमचा हा निर्णय म्हणजे मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळवून देणारा असल्याची टीका केली. (Abu Azmi should join MIM, Imtiaz Jalil's offer.) केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देशभरातील मुस्लीम आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी दिलेला सल्ला झुगारून एमआयएमने शंभर जागा लढवण्याचा निर्णय निराशाजनक आहे.

एकूण जागांच्या २५ टक्के जागा लढवून भाजपला सत्तेपासून रोखता येणार नाही, याने केवळ मत विभाजनच होईल, अशी नाराजी आझमी यांनी व्यक्त केली होती. (Samajwadi Party Mla Abu Asim Azami) यावर उलट एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीच आझमी याना एमआयएममध्ये येण्याची आॅफर दिली.

आझमी यांच्या ट्विटला उत्तर देतांना इम्तियाज जलील म्हणाले, मै एमआयएम की तरफसे अबू आसिम भाई को मजलिस ज्वाइन करने की दावत देता हू. हम मिलकर युपीमे सभी जातीयवादी पार्टीयोका मुकाबला करेंगे. समाजवादी पक्षाकडून प्रामाणिकपणाचे फळ काय मिळते याचे उदाहरण म्हणजे आझम खान हे होते.  त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा खोटा बुरखा काढून आपल्या लोकांसाठी एकत्र येऊन लढूयात, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

एमआयएमवर कायम भाजपची बी टीम म्हणून आरोप केला जातो. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालसह देशभरात एमआयएमने लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांत देखील सहभाग घ्यायला सुरूवात केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचा खासदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने विजयी झाला.

त्यानंतर बिहार राज्यात देखील एमआयएमचे पाच आमदार निवडून आले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभेच्या शंभर जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर एमआयएमवर पुन्हा टीका होऊ लागली आहे. भाजपला मदत करण्यासाठीच एमआयएमने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाऊ लागले.

तर भाजपला रोखणे अशक्य..

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी देखील एमआयएमच्या या निर्णयाबद्दल टि्वटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. देशभरातील मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष समाजाने सल्ला दिल्यानंतरही एमआयएमने उत्तरप्रदेशात शंभर जागा लढण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. केवळ २५ टक्के जागा लढून उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा सरकार स्थापन करण्यापासून रोखणे अशक्य आहे.

याने फक्त मत विभाजन होईल, असेही आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. त्याला उत्तर देतांना एमआयएमने आता थेट आझमी यांनाच एमआयएममध्ये येण्याचे आवाहन केले आहे. यावर आता आझमी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com