अब्दुल सत्तारांनी शब्द पाळला, मालेगावच्या जोशिंदा काढ्याचे वाटप सुरू

डॉक्टर, पोलीस ,महसूल व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी, पत्रकार व कोविड योद्धे यांना तसेच मतदार संघातील ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले त्या गावात पहिल्या टप्यात प्राधान्याने काढा वाटप सुरू केले आहे. सदरील काढा मोफत तसेच घरपोच देण्यात येणार आहे. सदरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मतदार संघात काढा वाटप केले जाणार आहे.
joshinda kadha distribute news sillod
joshinda kadha distribute news sillod

औरंगाबाद ः सध्या कोरोनाशी मुंबईच्या रुग्णालयात लढा देणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे. मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सत्तार गेल्या तीन-चार महिन्यंपासून सातत्याने प्रयत्न करत होते. दुर्दैवाने शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढले, एवढेच नाही तर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोनाचे निदाण होण्यापुर्वीच सत्तार यांनी मतदारसंघातील शहरी भागाच्या नागरिकांसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या मालेगावच्या काढ्याची ऑर्डर दिली होती. पहिल्या टप्यात वीस हजार लोकांना हा काढा घरपोच देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, अखेर आजपासून या ‘जोशिंदा‘ काढ्याचे वाटप सिल्लोड शहरात सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी जोशिंदा काढ्याच्या वाटपाला आजपासून सुरूवात केली. कोरोना विषाणुंचा संसर्ग लक्षात घेता  कोविड योद्धे तसेच नागरिकांना हा काढा दिला जात आहे. शहरातील शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जोशींदा काढाचे वाटप करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे महिन्याभरापूर्वी कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते.  आज मालेगाव कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेथील नागरिकांनी जोशींदा काढ्याचे सेवन केल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली व मालेगावातील कोरोना आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

सिल्लोड-  सोयगाव मतदारसंघातील नागरिकांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी मालेगावच्या मोहम्मदिया तिब्बीया कॉलेज येथून स्वखर्चाने पहिल्या टप्प्यात मतदार संघातील 20 हजार नागरिकांसाठी जोशींना काढ्याची ऑर्डर दिली होती. या मागणी प्रमाणे मालेगाव येथून जोशिंदा काढ्याचा पुरवठा सुरू झाला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सुचनेने त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांच्या नेतत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर, पोलीस ,महसूल व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी, पत्रकार व कोविड योद्धे यांना तसेच मतदार संघातील ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले त्या गावात पहिल्या टप्यात प्राधान्याने काढा वाटप सुरू केले आहे. सदरील काढा मोफत तसेच घरपोच देण्यात येणार आहे. सदरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मतदार संघात काढा वाटप केले जाणार आहे. 

५२ दात्यांचे रक्तदान..

संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे देखील आज आयोजन करण्यात आले होते. शहरातील आर.एल. पार्क येथील शिबिरात  ५२ दात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. यावेळी दात्यांना प्रमाणपत्र व जोशिंदा काढाही देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com