मराठवाड्यासह मतदारसंघातील सिंचन प्रक्लपांसाठी अब्दुल सत्तारांनी पुन्हा घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट.. - Abdul Sattar again met the Minister of Water Resources for irrigation projects in the constituency including Marathwada.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मराठवाड्यासह मतदारसंघातील सिंचन प्रक्लपांसाठी अब्दुल सत्तारांनी पुन्हा घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा मत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुंबई ः  मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, (Abdul Sattar again met the Minister of Water Resources for irrigation projects in the constituency including Marathwada) असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. (Shivsena Minister Abdul Sattar, Maharashtra) या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.

या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नविन सिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Ncp leader and Minister Jayant Patil, Maharashtra)

पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे,  तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी संबधित यंत्रणेला दिल्या.

दरम्यान सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा मत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर  या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

हे ही वाचा ः भाजपच्या निलंबित १२ आमदारांना आणखी एक धक्का..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख