वाट न पाहता आरती करून घेतली; आमदार सावे खैरेंवर नाराज..

सुपर संभाजीनगर पुस्तक विमोचन कार्यक्रम आणि त्याला शिवसेनेच्या १४ माजी महापौरांनी लावलेली हजेरी यावर देखील भाजपने शिवसेनेला सुनावले होते.
वाट न पाहता आरती करून घेतली; आमदार सावे खैरेंवर नाराज..
bjp mla atul save angrey news Aurangabad

औरंगाबाद ः दरवर्षी प्रमाणे गणेश महासंघाच्या वतीने शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती राजकीय नेत्यांच्या हस्ते करण्यात आली. पण यावेळीही शिवसेना-भाजपमध्ये वादावादी झाली. सकाळी अकरा वाजता आरती करण्यात येणार होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी मंदिरात जमले होते. (Aarti performed without waiting; MLA Atul Save angry) अकरा वाजल्यामुळे खैरेंसह सर्वांनी आरती सुरू केली. काही वेळात भाजप आमदार अतुल सावेही तिथे पोहचले. आपण येण्याआधीच आरती सुरू केल्यामुळे सावे नाराज झाले. काही मिनिटे माझी वाट का पाहिली नाही, असे म्हणत त्यांनी खैरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये कटुता आली होती. (Bjp Mla Atul Save Aurangabad) आता सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटल्यानंतर या दोन पक्षातील संबंध अधिकच ताणले गेले आहे. (Shivsena Leader Chandrakant khaire) आगामी महापालिका निवडणुका पाहता या दोन पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेला वेगळीच धार चढली आहे. संधी मिळेल तेव्हा शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर टीका करतांना दिसतात.

शिवसेनेच्या सुपर संभाजीनगर पुस्तक विमोचन कार्यक्रम आणि त्याला शिवसेनेच्या १४ माजी महापौरांनी लावलेली हजेरी यावर देखील भाजपने शिवसेनेला सुनावले होते. आज संस्थान गणपतीच्या आरतीवेळी देखील या दोन पक्षातील कुरबुरी दिसून आल्या. औरंगाबाद गणेश महासंघाच्या वतीने दरवर्षी संस्थान गणपती येथे आरती करून गणेशोत्सावाची सुरूवात केली जाते. महासंघांच्या वतीने या सोहळ्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाते.

परंतु सुरुवातीपासूनच महासंघाच्या या कार्यक्रमावर शिवसेनेचा पगडा राहिलेला आहे. राज्यात व महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होती तोपर्यंत दोन्ही पक्षाचे नेते गळ्यात गळे घालून संस्थान गणपती येथे हजर राहायचे. पण राज्यातील सत्ता समीकरण बदलले आणि एकमेकांचे अनेक वर्ष मित्र आणि सत्तेचे वाटेकरी राहिलेले पक्षच आता विरोधात उभे ठाकले आहेत. संस्थान गणपती येथील आरतीसाठी सकाळी अकराची वेळ निश्चित करण्यात आली होती.

आम्ही तासनतास वाट पहायचो..

शिवसेनेसह इतर पक्षांचे नेते, पदाधिकारी, महासंघाचे पदाधिकारी आरतीसाठी उपस्थित होते. भाजपचे आमदार अतुल सावे मात्र आलेले नव्हते. तेव्हा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी देखील थोडावेळ वाट पाहून मग आरती सुरू करू, अशी भूमिका घेतली. पण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व अन्य लोकांनी आता उशीर झाला आहे, म्हणत आरतीला सुरूवात केली. आरती सुरू असतांनाच आमदार अतुल सावे संस्थान गणपतीला पोहचले.

मात्र आपली वाट न पाहता शिवसेना नेत्यांनी आरती सुरू केल्याबद्दल ते नाराज झाले. आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्याकडे त्यांनी ही नाराजी व्यक्त देखील केली. आम्ही तुमच्यासाठी तासनतास थांबायचो, अगदी शासकीय कार्यर्कम असला तरी. मग तुम्ही काही मिनिटे का थांबू शकला नाहीत?  हे बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी प्रकट केली. यामुळे संस्थान गणपती मंदिरातील वातारण काहीकाळ तापले होते.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in