आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारला, विभागीय आयुक्तांना दिले पत्र..

उद्या परभणीत त्या दाखल होणार आहेत.
Parbhani collector take a charge News
Parbhani collector take a charge News

परभणी : आयएएस अधिकारी आंचल गोयल यांनी आज जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याकडे त्यांनी पदभार स्वीकारत असल्याचे पत्र आज दुपारी दिले. उद्या परभणीत येऊन त्या प्रत्यक्ष पदभार स्वीकारणार आहेत. (Aanchal Goyal accepted the post, letter given to the Divisional Commissioner.) परभणीच्या जिल्हाधिकारी पदी झालेली गोयल यांची नियुक्ती अचानक थांबवण्यात आली होती. त्यांना परत मुंबईत बोलावण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

अनेक आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय घडामोडीनंतर अखेर आज गोयल यांना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. (Anchal Goyal Collector Parbhani) त्यानंतर त्यांनी विभागीय  आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पत्र पाठवून आपण पदभार स्वीकारत असल्याचे सांगितले. दरम्यान, गोयल या उद्या सकाळी परभणीत पोहचणार आहेत, त्यानंतर त्या प्रत्यक्ष पदभार स्वीकारतील, अशी माहिती आहे.

आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता.तीन) परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. दिपक मुगळीकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर परभणी जिल्हाधिकारी पदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार गोयल या पदभार घेण्यासाठी परभणीत आल्या देखील होत्या. परंतू स्थानिक राजकीय दबावातून त्यांना पदभार घेण्याापासून दुर ठेवण्यात आले.

दीपक मुगळीकर यांनी त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे द्यावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने काढण्यात आल्याने गोयल यांना परतावे लागले होते. परंतू, या प्रकरणी परभणीकरांनी सोमवारी (ता.दोन) निदर्शने करून शासनावर दबाव वाढवला होता. प्रसार माध्य्मांवर देखील या बदली प्रकरणाची व राजकीय हस्तक्षेपाची चर्चा होती.

अखेर परभणीकरांच्या जनआंदोलनाला यश मिळाले आणि आंचल गोयल यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. कागदोपत्री त्यांनी पदभार स्वीकारला असला तरी प्रत्यक्षात उद्या परभणीत त्या दाखल होणार आहेत. दरम्यान, गोयल यांनी आज दुपारी  पाच वाजेच्या दरम्यान परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्याचे पत्र औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवले. केंद्रेकर यांनी देखील आपल्याला पत्र मिळाले असल्याचे सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com