मोफत लसीकरणातून वाचलेले सात हजार कोटी ठाकरे सरकारने गरीबांना वाटावे.. - The 7,000 crore Thackeray government saved from free vaccination should be given to the poor. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मोफत लसीकरणातून वाचलेले सात हजार कोटी ठाकरे सरकारने गरीबांना वाटावे..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 जून 2021

करे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नाही.

औरंगाबाद ः देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. (The 7,000 crore Thackeray government saved from free vaccination should be given to the poor.) एकरकमी धनादेश देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने  वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्यांना वाटावे, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतांना भाजप नेत्यांनी मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला सल्ला द्यायला सुरूवात केली आहे. (The Thackeray government had indicated its readiness to vaccinate the Center with a check.) राज्यातील लसीकरण मोहिम वेगाने करता यावी, यासाठी ठाकरे सरकारने केंद्राकडे एका चेकने लस घेण्याची तयारी दर्शवली होती. नेमक्या याच मुद्यावरून आता रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठाकरे सरकारला सल्ला देतांना म्हटले आहे की,  देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे.( Centrel State Minister Raosaheb Danve) सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करतो. 

आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस आर्थिक संकटात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज द्यावे. केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एकरकमी धनादेश देऊन १२ कोटी लस मात्रा विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. (The central government took full responsibility for the supply of vaccines) आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने या धनादेशाचा वाचलेला सुमारे सात हजार कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावा.

गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा देण्याची गरज असून ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नाही. जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे व राजकारण न करता जनतेच्या जीवित रक्षणास प्राधान्य द्यावे, असेही दानवे म्हणाले.

हे ही वाचा ः शिवसेनेचा वर्धापनदिन अन् खैरे-दानवेंचा छत्तीसचा आकडा कायम..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख