हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या ३८ पीएसए प्रकल्पातून राज्यात दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन - 53 PSA project to generate 53 metric tons of oxygen per day in the state | Politics Marathi News - Sarkarnama

हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या ३८ पीएसए प्रकल्पातून राज्यात दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे.

औरंगाबाद ः ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. (Health Minister Rajesh Tope Press Intraction On corona) आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला  ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्ण संख्या, आॅक्सिजनची सद्यस्थिती व एकंदरितच कोरोना संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. (oxygen Demand Is Increse In state, Says Tope) टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादित होत असून मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे.

ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. (More Oxygen Plant start In State) आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले. हवेतील आॅक्सिजन रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला तर लिक्विड आॅक्सिजनची मागणी आपोआप कमी होईल , असेही टोपे म्हणाले.

राज्यात पावणे सात लाख कोरोना रुग्ण..

राज्यातील कोरोना रुग्णांसंदर्भात माहिती देतांना आजघडीरा राज्यात पावणे सात लाख सक्रीय रुग्ण असल्याचे टोपे यांनी सांगितले. रुग्ण संख्या अधिक असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८५ टक्के इतके आहे.(Eighty five percent recovery rate)  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असून कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरणाचा मोठा वाटा आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ७५ लाख लसीकरण करण्यात आले आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतील नंबर एक वर असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

१८ ते ४५ वयोगटातील लसीकरणावरून राज्यभरात गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. यावर स्पष्टीकरण देतांना टोपे म्हणाले, एकाच वेळी गर्दी, ठरलेल्या केंद्रावर न जाता अन्य ठिकाणी जाऊन लस घेणे या प्रकारांमुळे अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. ( Vaccine Shortage Also In Maharashtra) हे मान्य असले तरी ज्या केंद्रावर लसीकरण होणार आहे, त्याच भागातील लोकांनी तिथे जाऊन लस घेतली तर हा प्रकार होणार नाही. 

या नव्या लसीकरण मोहिमेाठी आपल्याकडे १ मे रोजी तीन लाख व्हॅक्सिन उपलब्ध होत्या. त्यानंतर आणखी ४ लाख लसी आल्या. सध्या आपल्याकडे सात लाख व्हॅक्सिन आहेत, आणि त्याचे वाटप  देखील करण्यात आले आहे. १८ ते ४५ वयोगटाला लसीकरण देतांना ३५ ते ४५ वयोगटाला प्राधान्य देण्याचा आरोग्य विभाग विचार करत असलल्याचेही टोपे यांनी सांगितले.

या शिवाय ४५ वर्षावरील लोकांसाठी काही हजार लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठीच्या कोव्हॅक्सीनचे चार लाख डोस अद्याप देणे बाकी आहे. त्यामुळे या चार लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी केंद्राने तातडीने लस पुरवावी, अशी मागमी देखील टोपे यांनी केली. 

तीन लाख रेमडेसिव्हिर आयात करणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिव्हिरवरून बराच गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप झाले. काही जिल्ह्यांमध्ये या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. (Three lac Redmisevir Injections Import by Government) हे प्रकार टाळण्यासाठी आणि ज्या रुग्णाला खरंच रेमडेसिव्हिर देण्याची गरज आहे, अशा रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तीन लाख रेमडेसिव्हर विदेशातून आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. यासाठी विशेष टास्क फोर्स आपण तयार करतो आहोत. या काळात आपल्याला १८ वर्षाखालील तरूण आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही टोपे यांनी सांगितले.

ही बातमी देखील वाचाः अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; एम्समध्ये उपचार सुरू

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख