मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ लाखांची मदत

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत या संकटाचा सामना करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये म.शि.प्र.मंडळाने अनेक वेळा स्वयंस्फूर्तीने मदत केली.
mspm news aurangabad
mspm news aurangabad

औरंगाबादः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत सामाजिक जाणिवेतून ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’ साठी  ५१ लाखाचा निधी जमा केला आहे. संस्थेचे सरचिटणीस व मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर यांच्या हस्ते आज सदरील निधीचा धनादेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संकटाशी राज्य व केंद्र सरकार आपापल्यापरीने लढा देत आहे. आरोग्य यंत्रणा अधिक सशक्त करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. राज्याप्रमाणेच देशात देखील कोरोनाच्या संकटात सरकारकडून सहायता निधी देण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याच्या आवाहनाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान दिले आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील मानधन आपले वेतन देऊन केले.  पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने देखील मदत केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केल्यानंतर सतीश चव्हाण म्हणाले, कोविड-19 (कोरोना व्हायरस) या विषाणूने जगभरात थैमान घातले असून आपल्या देशासह राज्यासमोर देखील मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.  महाराष्ट्र शासन अतिशय नियोजनबध्द व धोरणात्मक पाऊले उचलून राज्यावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.

कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी शासनाबरोबरच सर्वांनी एकजूट दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे याच भावनेतून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणीवेतून ५१ लाखांचा निधी जमा केला.

ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम आमची संस्था करीत आली आहे. ज्यावेळी देशावर, राज्यासमोर अशा प्रकारची आपत्ती आली त्या त्या वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत या संकटाचा सामना करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये म.शि.प्र.मंडळाने अनेक वेळा स्वयंस्फूर्तीने मदत केली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com