औरंगाबादेत कोरोनाचा ३५ वा बळी; बाधितांच्या संख्येतही ५१ ने वाढ

सायंकाळी बाधितांमध्ये १ ने वाढ झाली होती. पण आज सकाळी तब्बल ५१ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने बाधितांचा आकडा १०७३ झाला. आज पॉझीटीव्ह सापडलेले रुग्ण हे शहराच्या विविध भागातील असून यामध्ये १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे.
corona victim 35 in aurangabad news
corona victim 35 in aurangabad news

औरंगाबादः शहरातील कोरोना बळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून काल रात्री उशीरा एका ६५ वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा एकूण आकडा ३५ झाला आहे. हिमायतबाग येथील या रुग्णास दम लागण्याचा त्रास जाणवत असल्यामुळे १८ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

स्वॅब अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. रात्री उशीरा उपचारा दरम्यान शरीरातील आॅक्सीनजचे प्रमाण कमी झाल्याने या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. तर आज सकाळी आलेल्या अहवालानूसार बाधितांच्या संख्येत ५१ ने वाढ होऊन ही संख्या १०७३ वर पोचली आहे.

शहरात नव्या कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असतांना मृतांचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात २० मे पर्यंत संपुर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु रुग्णांची संख्या काही कमी होतांना दिसत नाही.

काल कोरोना बाधितांचा आकडा सकाळी १०२१ इतका होता, तर बळींची संख्या ३४ होती. सायंकाळी बाधितांमध्ये १ ने वाढ झाली होती. पण आज सकाळी तब्बल ५१ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने बाधितांचा आकडा १०७३ झाला. आज पॉझीटीव्ह सापडलेले रुग्ण हे शहराच्या विविध भागातील असून यामध्ये १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे.

रोहिदास नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), जाधववाडी (१), जटवाडा रोड (१), हिमायत बाग (१), किराडपुरा (४), पुंडलिक नगर (१), मुकुंदवाडी (१), नारेगाव (१), जयभीम नगर (१), संजय नगर (१), रहिम नगर (१), कैलास नगर (१), गादल नगर (१),  सादात नगर, गल्ली नं. ६ (४), शिवनेरी कॉलनी (१), विद्या नगर, सेव्हन  हिल (१), गल्ली नं. २५, बायजीपुरा (४), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (१), मकसूद कॉलनी (१), जाधववाडी (१), गल्ली नं. २३, बायजीपुरा (२), गल्ली नं. ३, बायजीपुरा (१), सातारा गाव (३), आदर्श कॉलनी, गारखेडा (३), गारखेडा परिसर (१), मित्र नगर (१), मिल कॉर्नर(१), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (१), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (१) अन्य (४) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (३) या भागातील हे कोरोनाबाधित रुग्ण आहेत.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com