पोलिसांवरील हल्ला प्रकरणी १७ जण ताब्यात, चारशे जणांवर गुन्हे दाखल

पोलिसांवरील हल्ल्यात प्रत्यक्षदर्शी आणि सिसीटीव्ही च्या आधारे ६० हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
Nanded Police Attack, 17 In Custdy and Fire File Agianst 400 Accused News
Nanded Police Attack, 17 In Custdy and Fire File Agianst 400 Accused News

नांदेड : गुरुद्वारामधून निघणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून काल सायंकाळी शिख तरूणांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला होता. या हल्यात पोलिस अधिकाऱ्यांची वाहने फोडण्यात आली होती, तर अनेक पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या हल्ला प्रकरणी पोलिसांकडून धरपकड सुरू होती. आतापर्यंत १७ जणांना ताब्यात घेण्यात आले साडेतीनशे ते चारशे अज्ञात हल्लेखोरांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नांदेड गुरुद्वारासमोर काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रचंड गदारोळ झाला. हल्लाबोल मिरवणुकीसाठी जमलेल्या हजारो शिख तरुणांच्या जमावाने हातात तलावरी घेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला चढवला होता. या प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत काय कारवाई केली, कुणाला अटक केली, गुन्हे दाखल केले का? यावर पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. 

शेळके म्हणाले, काल झालेल्या पोलिसांवरील हल्ल्यात प्रत्यक्षदर्शी आणि सिसीटीव्ही च्या आधारे ६० हल्लेखोरांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ३५० ते ४०० जणांवर वजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडात शिख समाजाकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या रागातून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या शिख तरूणांनी काल थेट पोलिसांवरच हल्ला चढवला होता. यात पोलिस अधिक्षकांसह काही अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. दगडफेकीत सहा पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले.

लाॅकडाऊनमुळे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या शिख धर्मीयांच्या हल्लाबोल मिरवणुकीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र हे आदेश धुडकावत शहरातून सायंकाळी सहावाजेच्या सुमारास हल्लाबोल मिरवणुक काढण्यात आली. अचनाक मिरवणूकीतील काही तरूण आक्रमक झाले आणि मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांवरच हल्ला चढवला होता. 

हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. या हल्ल्यात पोलिस अधिक्षकांचे अंगरक्षक  दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. या घटनेने राज्यभरात एकच खळबल उडाली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणी आज कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले तर शकडो अज्ञातांवर गुन्हे दाखल केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com