नोव्हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका कारभारी - Education Extension Officers, Heads of Centers, Headmasters and Anganwadi Supervisors will be appointed on these Grampanchayats | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

नोव्हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका कारभारी

 तात्या लांडगे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

आतापर्यंत काही ग्रामपंचायतींवर तालुक्‍यातील विस्ताराधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असून अद्याप निवडणूक घेण्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.  त्यामुळे त्याठिकाणी नव्याने प्रशासक नियुक्‍ती केली जाणार आहे.

सोलापूर : कोरोनामुळे मुदत संपूनही ग्रामपंचायतींची निवडणूक घेणे अशक्‍य झाले आहे. त्यामुळे सरपंच व सदस्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. तसेच त्यांना ग्रामपंचायतींचा कारभार पाहता येत नाही. सोलापूर जिल्ह्यातील 520 ग्रामपंचातींची मुदत नोव्हेंबरअखेर संपुष्टात येणार आहे. या ग्रामपंचायतींवर आता नोव्हेंबरअखेर शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व अंगणवाडी  पर्यवेक्षिकांची नियुक्‍ती केली जाणार आहे. असा प्रयोग राज्यभर सुरु आहे.

पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, कोरोनामुळे राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणूक घेता आलेली नाही. सुरवातीला अशा ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री सुचवतील, त्या व्यक्‍तींची प्रशासक म्हणून निवड करण्याचे ठरले. मात्र, राज्यपालांनी विरोध केल्यानंतर प्रशासक नियुक्‍तीची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली.

त्यानुसार आता कार्यवाही केली जात असून आतापर्यंत काही ग्रामपंचायतींवर तालुक्‍यातील विस्ताराधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असून अद्याप निवडणूक घेण्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या
नाहीत.  त्यामुळे त्याठिकाणी नव्याने प्रशासक नियुक्‍ती केली जाणार आहे.

नोव्हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती....

करमाळा : 29,  माढा : 82,  बार्शी : 91,  उत्तर सोलापूर : 19,  मोहोळ : 65,  पंढरपूर : 53,  माळशिरस : 46,  सांगोला : 84,  मंगळवेढा : 8,  दक्षिण सोलापूर : 85,  अक्‍कलकोट : 57.

तालुक्‍यांकडून मागविली माहिती....

नोव्हेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर वर्ग- तीनचे
अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्‍त केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित तालुक्‍यांमध्ये किती केंद्रप्रमुख, शिक्षण विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत, याची माहिती मागविली आहे.

- चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख