हेवेदावे प्रत्येकच पक्षात असतात, पण आता संघटनेवर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही... - in every party there are a claims but now nobody can do allegations on organization | Politics Marathi News - Sarkarnama

हेवेदावे प्रत्येकच पक्षात असतात, पण आता संघटनेवर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही...

मनोज भिवगडे
शनिवार, 12 जून 2021

पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणे शक्य झाले नाही. आता जिल्ह्यांचा दौरा करीत आहो. अनेक अपेक्षित, अनपेक्षित चित्र यादरम्यान पक्ष संघटनेत दिसून आले. त्यामुळे संघटनेचे आरोग्य सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

अकोला : आमदार नाना पटोले MLA Nana Patole यांना कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची State President of Congress सूत्रे स्वीकारली आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक राज्यभर वाढला. त्यामुळे पक्षसंघटनेसाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण आता कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे But now corona's condition in now in control त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. हेवेदावे प्रत्येकच पक्षात असतात, पण कॉंग्रेसमध्ये संघटनेच्या कामावर बोट ठेवण्याची संधी आता कुणालाही मिळणार नाही, असे त्यांनी काल येथे पत्रकारांना सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हा-जिल्ह्यांत जाऊन स्थानिक पातळीवर आढावा घेत असलेले नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष संघटनेचे आरोग्य सुधारण्यासाठी लवकरच योग्य त्या ‘इंजेक्शन’चा डोज दिला जाईल, असे सांगून प्रदेशपासून तालुका स्तरापर्यंत संघटनेत बदल घडविण्याचे संकेत दिले. नाना पटोले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. संघटना बळकट करण्यासाठी ते आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. यातच वऱ्हाडाच्या दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना पक्ष संघटनेतील बदलाचे संकेत दिले. 

विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतानाही नानांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली. केवळ निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या नेत्यांना विधानसभा, विधानपरिषदेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष बनविले जाते, हा समज त्यांनी आपल्या कार्यशैलीने खोडून काढला. आपली आक्रमकता आणि कौशल्याने आता त्यांनी पक्ष संघटनेत ‘जान’ फुंकणे सुरू केले आहे. संघटना बळकट करून त्यांचे सकारात्मक परिणाम येत्या निवडणुकांमध्ये दिसतील, असा विश्‍वास आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये बळावू लागला आहे. 

पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणे शक्य झाले नाही. आता जिल्ह्यांचा दौरा करीत आहो. अनेक अपेक्षित, अनपेक्षित चित्र यादरम्यान पक्ष संघटनेत दिसून आले. त्यामुळे संघटनेचे आरोग्य सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. हेवेदावे प्रत्येक पक्षातच असतात. त्यापासून काँग्रेसही सुटला नाही. मात्र, यापुढे संघटनेवर कुणालाही बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नाना म्हणाले. पक्ष संघटनेतील बदलाबाबत काम सुरू आहे. लवकरच प्रदेशपासून तालुका स्तरावर बदल करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे नानांनी एका प्रश्नांच्या उत्तरात सांगितले. 

पदाधिकाऱ्यांसोबत नेत्यांच्या घरी चर्चा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अकोला येथे आल्यानंतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कोणताही मेळावा आयोजित केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना वेळ दिला नाही, अशी खंत राहू नये म्हणून कोरोना नियमांचे पालन करीत माजी महापौर मदन भरगड यांच्या घरी भेट दिली असता तेथे त्यांना काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख