Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

केंद्र सरकारने कोरोना काळात माणसं मारण्याचे काम केले : नाना पटोले

असे झाले असेल तर ते निराशाजनक आहे. जे आहे ते पळवू नये. तुम्हाला काही हवे असेल तर नव्याने निर्माण करण्याची भूमिका असली पाहिजे.

अकोला : देशभरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात to control the corona situation केंद्र सरकारला सपशेल अपयश आले. या काळात अक्षम्य निष्काळजीपणा करण्यात आला. राज्याराज्यांत दुजाभाव करण्यात आला. the difference was done between states महाराष्ट्राकडे तर केंद्राने साफ दुर्लक्ष केले. एकप्रकारे कोरोना काळात केंद्र सरकारने माणसे मारण्याचे काम केले, central government killed the people during corona period अशा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काल प्रथमच अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेले नाना पटोले यांनी काल स्वराज्य भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, माजी महापौर मदत भरगड, मनपा विरोधी पक्ष नेते साजीद खान, रमाकांत खेतान, अविनाश देशमुख, कपील रावदेव आदींसह नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर कोरोना नियंत्रणात निष्काळजीपणा करीत माणसं मारण्याचे काम केल्याचा आरोप केला. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या विषयांवरही केंद्राकडून निराशाच झाल्याचे ते म्हणाले. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना शेतीसाठी लागणारी औषध, खतं, बियाणे यांच्या वाढलेल्या दरांचा विचार न करता केंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव हा शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. 

हमीभावात केंद्राकडून शेतकऱ्यांची निराशा
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावात दरवर्षी किमान १० टक्के वाढ अपेक्षित असते. मात्र, यावर्षी केंद्राने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना निराश करणारे असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. कोरोना नियंत्रणात अपयशी ठरलेले केंद्र सरकारने पीक विमा शेतकऱ्यांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या फायदाचा कसा ठरेल यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही नानांनी केंद्र सरकारवर केला.

ओबीसी आरक्षणाबाबत खोट्या वल्गना
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओडिसीचे आरक्षण रद्द होण्यामागे यापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जबाबदार ठरविले. ओबीसी आरक्षणाबाबत आता खोट्या वल्गना फडणवीस करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सोयाबीन पीक विम्याबाबत केंद्राकडे बोट 
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या चुकीच्या सर्वेमुळे सोयाबीन पीक विम्यापासून वंचित रहावे लागले. याबाबत राज्य सरकार हस्तक्षेप करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी केंद्राकडे बोट दाखविले. पीक विम्याचे नियम हे शेतकऱ्यांना लाभ देणारे नव्हे तर विमा कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. पीक विम्यासाठी आता ‘बीट पॅटर्न’ राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ज्या सोयाबीन उत्पादकांना यावर्षी पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यांच्याबाबत राज्य सरकार काय करणार किंवा काँग्रेस त्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे नानांनी टाळले. 

जे आहे ते पळवू नये! 
अकोला जिल्ह्यातून पशुधन आर्थिक विकास मंडळ नागपूरला घेऊन जाण्यात काँग्रेसमधील तुमच्याच सहकाऱ्याने प्रयत्न केले. अकोला जिल्ह्याला काँग्रेसने नवीन काही दिले नाही. मात्र, आहे तेही येथून घेऊन गेले. याबाबत नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतो, असे झाले असेल तर ते निराशाजनक आहे. जे आहे ते पळवू नये. तुम्हाला काही हवे असेल तर नव्याने निर्माण करण्याची भूमिका असली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com