कोरोनाच्या संकटात कार्यालयात मटण पार्टी आयोजित करणारा BDO निलंबित - raigad zp ceo suspends BDO for arranging party in office in corona crisis | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या संकटात कार्यालयात मटण पार्टी आयोजित करणारा BDO निलंबित

दिनेश पिसाट
शुक्रवार, 1 मे 2020

कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्युमुळे महाडमध्ये भितीचे वातावरण असताना त्या दिवशीच महाड पंचायत समिती कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मारला मटनावर ताव मारल्याने संतापलेल्या नागरिकांनी हळदे यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईने समाधान व्यक्त केले आहे.

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारी प्रशासकीय यंत्रणा जुंपलेली असताना महाड पंचायत समिती कार्यालयात केलेली मटणाची पार्टी महाडचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांना चांगलीच भोवली आहे. बैठकीच्या नावावर सरकारी कार्यालयात मटणाच्या पार्ट्या आयोजित केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

गोडांबे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. 29 एप्रिल) महाड  पंचायत समिती कार्यालयातच मटणाची पार्टी आयोजित केली होती. यात लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हेदेखील सहभागी झाले होते. याच्या  जनमानसांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या , होत्या .संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना यांना मटणाच्या पार्ट्या सुचतात कश्या आशा स्वरूपाची चर्चा जिल्ह्यात होती. याची दखल घेत तात्काळ हळदे यांनी गोडांबे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि त्याबाबतचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. 

कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्युमुळे महाडमध्ये भितीचे वातावरण असताना त्या दिवशीच महाड पंचायत समिती कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मारला मटनावर ताव मारल्याने संतापलेल्या नागरिकांनी हळदे यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईने समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा परिषदेवर व तालुक्यात बीडीओवर असते. तेच बीडीओ असे वागत असतील तर इतर कर्मचाऱ्यांनी काय बोध घ्यायचा असा सवाल उपस्थित झाला होता. 

हे पण वाचा : मालेगावात महापालिकेच्या ३३ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असतांना मनपाच्या  कोवीड केअर सेंटर व क्वारंटाईन रुग्णालया बाहेर सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक दिलेले 33 कर्मचारी कामावर हजर झाले नाही. दरम्यान अत्यावश्यक कामावर रूजू न झाल्याने त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा कर्मचारींवर कोरोना साथ सुरू झाल्यानंतर प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे. 

मनपाच्या वाँचमन व शिपाई संवर्गातील 33 कर्मचाऱ्यांना जीवन हॉस्पिटल, मन्सूरा हॉस्पिटल, एटीटी हायस्कूल, मालेगाव हायस्कूल, कर्मवीर या. ना. जाधव हायस्कूल यासह विविध रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरवर सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले. नेमणूक देण्यात आल्या नंतरही संबांधित कर्मचारी याठिकाणी कामावर हजार न झाल्याने अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलीस ठाण्यात या ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मनपा अधिकारी कर्मचारींमध्ये खळबळ उडाली आहे. नुकतेच महापालिकेत यापूर्वी आयुक्त म्हणून कामकाज केलेले जीवन सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नव्या आयुष्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका कामकाजाला गती मिळण्याची शक्यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख