परमबीरसिंग यांच्या नजिकचे पोलिस निरीक्षक कोथमिरेंची गडचिरोलीला बदली... - Police inspector who close to Parambisingh transfers to Gadchiroli | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

परमबीरसिंग यांच्या नजिकचे पोलिस निरीक्षक कोथमिरेंची गडचिरोलीला बदली...

सूरज सावंत
गुरुवार, 6 मे 2021

गडचिरोली म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग मानली जाते...

मुंबई : पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दलात साफसफाई सुरू केली असून मुंबईत बरीच वर्षे ठाण मांडून बसलेले एटीएस (ATS) मधील पोलिस निरीक्षक दया नायक यांची गोंदियाला बदलीचा आदेश जारी करण्यात आला. दुसरीकडे ठाणे पोलिस आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाचे राजकुमार कोथिमिरे यांची थेट गडचिरोली येथे बदली करण्यात आली. त्यांना तातडीने रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. (Police inspector Rajkumar Kothmire transfers to Gadchiroli)

चमकमफेम अधिकारी म्हणून दया नायक (Daya Nayak) यांचे नाव परिचित आहे. कोथमिरे यांचे नाव नुकतेच जाहीर चर्चेत आले होते. अकोल्यात नियुक्तीस असलेले पोलिस निरीक्षक घाडगे यांनी ठाण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (FIR against IPS officer Parambirsignh)

या संदर्भात परमबीरसिंग यांनी कशा प्रकारे त्यांचा छळ केला आणि खऱ्या आरोपींना सोडण्यासाठी दबाव आणला, अशी तक्रार यात करण्यात आली आहे. त्यात कोथमिरे यांचे नाव वारंवार घेण्यात आले आहे. त्यामुळे तर कोथमिरे यांची बदली झाली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. परमबीरसिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश राज्य सरकारने संजय पांडे यांना दिले आहेत. मात्र पांडे यांनी आपल्यावर दबाव आणल्याची तक्रार परमबीरसिंग यांनी उच्च न्यायालयात केल्याने पांडे यांनी या चौकशीस नकार दिला आहे. मात्र परमबीरसिंग यांच्या कृत्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू झाल्याचे यातून दिसून येत आहे. 

ही बातमी वाचा : पोलिस निरीक्षक दया नायक यांना गोंदिया दाखवले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख