जनतेने आदर्श कोणाचा घ्यायचा ! शासकीय आदेशाची पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडूनच होतेय पायमल्ली

कायद्याचे ज्यांनी रक्षण करायचे, हेच पदाधिकारी, अधिकारी भक्षक बनले, तर सर्वसामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचाधाक कोणी पाळायचा,हीच मंडळीजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता कायदे तोडतात.
sangram jagtap and anil rathod.jpg
sangram jagtap and anil rathod.jpg

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आरोग्य आबादित रहावे, कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी लाॅकडाऊन करून आचारसंहिता लागू करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पारीत केले, मात्र या आदेशाची आमदार, माजी आमदार, जबाबदार अधिकारीच पायमल्ली करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने आदर्श कोणाचा घ्यायाच, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

काल शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह 28 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहितेबाबत केलेल्या आदेशाचे त्यांनी उल्लंघन करून चीनचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनचा माल वापरायचा नाही, ही राठोड यांची भूमिका बरोबर असली, देशप्रेमाला पुरक असली, तरी आचारसंहिता असताना केलेले आंदोलन, परवानगी न घेता केलेले आंदोलन हे त्यांना महागात पडले. प्रत्यक्षात त्यांनी परवानगी घेतली असती व चीनविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या, तर गुन्हे दाखल झाले नसते.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबतीत हीच स्थिती झाली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवाय तोंडाला मास्क न लावता आमदारांनी शुभेच्छा स्विकारल्या. आचारसंहितेच्या काळात गर्दी करणे, तोंडाला मास्क न लावणे हा कायद्याने गुन्हाच आहे. हे आमदारांना माहिती नव्हते काय. इतर वेळी कायद्याच्या सल्ल्यानुसार चालणारे हे पदाधिकारी कसे चुकतात, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यासह इतर 15 ते 20 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. लोकांनी आमदारांचा काय आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. 

जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्यावर काल गुन्हा दाखल झाला. त्यांनी जिल्हाबंदीचे उल्लंघन केले होते. पुणे ते नगर असा प्रवास त्या करीत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, पासेस न घेता जिल्हाबंदी करण्यास बंदी आहे. असे पास घेण्यासाठी आॅनलाईन पद्धतीही विकसित झाली आहे. सर्वसामान्यांचे हजारो अर्ज दाखल झाले आहेत. अनेकजण इतर जिल्ह्यात जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. असे असताना एक जबाबदार अधिकारी असेलेल्या नावंदे यांनी मात्र कोणतीही परवानगी न घेताच जिल्हा पार केला. त्यामुळे त्यांच्यावर काल बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हारताळ फासून पुण्यास आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुणेवारी केली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. लाॅकडाऊनच्या काळात गेले तीन महिने हेच अधिकारी लोकांना कायदा शिवकवत होते. जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेकांवर गु्न्हे दाखल झालेले होते. असे असताना या अधिकाऱ्यांनी असे का केले. कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याला जायचे होते, तर केवळ एक आॅनलाईन पास घेणे त्यांना अवघड होते का. त्यांच्या इशाऱ्यावर संबंधित पास त्यांना घरपोहच मिळाला असता. असे असताना या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली.

कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात तेव्हा...

कायद्याचे ज्यांनी रक्षण करायचे, हेच पदाधिकारी, अधिकारी भक्षक बनले, तर सर्वसामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा धाक कोणी पाळायचा, ज्यांना पास घरपोहच मिळू शकतो, ज्यांच्या हाती सर्व यंत्रणा आहे, हीच मंडळी पास न घेता, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता कायदे तोडतात, तर सर्वसामान्य लोक का असे नाही करणार. ज्यांना खरोखर जिल्हा पार करण्याची गरज आहे, असे अनेकजण सध्या आॅनलाईन अर्ज करूनही प्रतीक्षेत आहेत. कायद्याच्या दृष्टीने सर्व सारखेच आहेत. असे असताना त्यांच्यावर हा अन्यायच नाही का, असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com