डाॅ. विखे- कर्डिलेंनी स्वतंत्र बैठका घेतल्या, महापौरपदासाठी भाजपची भूमिका नेमका कोण ठरविणार?

विखे पाटील यांना तरी `घाट` ओलांडावा लागतो, मात्र कर्डिले सरळ-सरळ शहरात `घुसतात`.एकाच पक्षात असूनही काही काळ दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते, मात्र ते आता निवळल्याचे दोघेही दाखवतात.
Kardile and vikhe.jpg
Kardile and vikhe.jpg

नगर : महापौर निवडणुकीबाबत भाजपने नेमका काय भूमिका घ्यायची, याबाबत सर्व नगरसेवक गोंधळात आहेत. याबाबत खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच विळद घाटात बैठक घेतली. नगरसेवकांची मते जाणून घेतली. काल माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनीही नगरसेवक, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्यामुळे भाजपची भूमिका नेमका कोण ठरविणार, याबाबत नगरसेवकांमध्येही संदिग्धता आहे. (Dr. Vikhe, Kardile held separate meetings, who will decide the role of BJP for the post of mayor?)

नगर शहरात भाजपची सूत्रे नेमका कोणाच्या हातात आहेत, याबाबत कायम चर्चा होते. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून आपलेच शहरावर कसे लक्ष आहे, हे वारंवार दाखवून देतात. भाजपचेच माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा तर थेट कार्यकर्त्यांशी संपर्क असतो. वारंवार ते नगरमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात. विखे पाटील यांना तरी `घाट` ओलांडावा लागतो, मात्र कर्डिले सरळ-सरळ शहरात `घुसतात`. एकाच पक्षात असूनही काही काळ दोघांमध्ये तणावाचे वातावरण होते, मात्र ते आता निवळल्याचे दोघेही दाखवतात. त्यामुळे दोघेही नगर शहरावर भाजप कार्यकर्त्यांवर आपलेच वर्चस्व राहण्यासाठी प्रयत्न करतात, हे अनेकवेळा दिसून येते.

महापौर निवडणुकीतही मागील वेळी भाजप-शिवसेनेचे सूत्र जुळत होते. असे असतानाही राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर झाला. या घडामोडीच्या वेळी कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. अनेक जिल्ह्यात भाजपच्या हातून सत्ता गेलेली आहे. त्यामुळे नगर शहरात पक्ष सत्तेत रहावा, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही वाटेल, यात शंका नाही. 

भाजपने सत्तेत राहणे म्हणजेच शिवसेना किंवा राष्ट्रवादीला मदत करणे, असा अर्थ निघतो. कारण महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवारच नाही. सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीला मदत केल्यास राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना ताकद देणे, असा अर्थ निघेल. हे खासदार विखे पाटलांना किती पचेल, हा प्रश्नच आहे. कारण लोकसभेची निवडणूक जगताप यांनी डाॅ. विखेंच्या विरोधात लढविली आहे. शिवाय कर्डिले यांचेही वजन वाढतच राहिल, हे घाटाखालील नेत्यांना रुचेल का, याबाबत शंकाच आहे.

शिवसेनेला मदत करणे म्हणजे राष्ट्रवादीला दूर ठेवणे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जगताप हे कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे शिवसेनेला मदत करून जगताप यांची ताकद खच्चीकरणे करणे, असा अर्थ निघेल. हे मात्र कर्डिले यांना रुचण्याची बिल्कुल शक्यता वाटत नाही. 

एकूणच महापौर निवडणुकीत भाजपने नेमका कोणती भूमिका घ्यावी, हे कर्डिले ठरविणार की खासदार विखे पाटील ठरविणार, याबाबत स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. कोणाच्या हातात `भूमिके`ची दोरी आहे, यावरून कोणाला मदत मिळेल, हे ठरणार आहे.

हेही वाचा..

हेही वाचा...

हेही वाचा...

हेही वाचा...

हेही वाचा..

हेही वाचा..

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com