कोळंबकरांविरुद्ध वाघमारेंच्या होर्डिंगने वडाळ्यात पेटला वाद

Kolambkar-vs-congress
Kolambkar-vs-congress

वडाळा  : वडाळा नायगाव विधानसभा क्षेत्रात गणेशोत्सवादरम्यान भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षांतर्फे ठिकठिकाणी फलकबाजी करण्यात आली.  मात्र वडाळा नायगाव कॉंग्रेसतर्फे भोईवाडा येथे लावण्यात आलेल्या फलकांवरून गुरुवारी (ता. 12) येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या फलकावरील 'कालही हा... दास, आजही हा...दास, वडाळा नायगाव याने केला भकास... आता परिवर्तन करणार डॉ. राजू वाघमारे' या ओळींमुळे वाद निर्माण झाला.

याद्वारे वाघमारे यांनी अप्रत्यक्षपणे नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर बोचऱ्या शब्दात ताशेरे ओढले. त्यामुळे कोळंबकर यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा वाद जास्त चिघळू नये म्हणून अखेर पोलिस व पालिकेने मध्यस्थी करत हा फलक गुरुवारी रात्री उतरविला.

गणेशोत्सवात गणेशभक्तांना शुभेच्छा देण्याऐवजी शुभेच्छा फलकाचे राजकारण करण्यात काय अर्थ आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभा क्षेत्रात यापूर्वी मी जी कामे केली, तशीच कामे पुढे करण्यावरच माझा भर राहील.

- कालिदास कोळंबकर, आमदार, वडाळा

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या कामाचे श्रेय आमदार कालिदास कोळंबकर लाटत आहेत. कॉंग्रेसचे काम, धोरण आणि श्रेय हे केवळ कॉंग्रेसचेच आहे. आपण स्वतःला कार्यसम्राट म्हणता, वास्तवात नटसम्राट आहात.
- राजू वाघमारे, कॉंग्रेस प्रवक्ते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com