मतदारांचा कौल असल्यामुळे माघार नाही : राजू शिंदे 

Raju Shinde BJP.
Raju Shinde BJP.

औरंगाबाद : "ही निवडणूक माझी नाही तर मतदारांची आहे. मतदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवा असे सांगितले होते, त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात कायम आहे'', अशी प्रतिक्रिया युतीचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी दिली आहे.

भाजपच्या राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी कायम ठेवली. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक आहेत. 


औरंगाबाद पश्चिम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महायुती असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिला. त्याठिकाणी युतीकडून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली.

आता या मतदारसंघात चुरशीची लढत दिसण्याची शक्यता आहे. कारण वंचितकडून संदीप शिरसाठ तर एमआयएमकडून अरुण बोर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


राजू शिंदे हे यापूर्वी भाजपकडून महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यासोबत त्यांना महापालिकेत भाजपकडून विविध पदे मिळाली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी माघार घ्यावी म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केली.

आज सकाळपासून त्यांचा फोन नॉट रीचेबल होता. त्यामुळे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणुकीच्या रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक राजू शिंदे यांनी माघार घेतली नसल्याने युतीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


''मी सकाळपासून भांगसीमाता गडावर असल्याने फोन लागत नव्हता. मतदारांचा कौल जाणून घेऊनच मी निवडणुकीत उतरलो होतो. निवडणूक जिंकल्यानंतर मी युतीला म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाठिंबा देणार'' असे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com