औरंगाबाद पश्‍चिममधून भाजपचे राजू शिंदे अपक्ष लढणार

 औरंगाबाद पश्‍चिममधून भाजपचे राजू शिंदे अपक्ष लढणार

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील औरंगाबाद पश्‍चिम या मतदारसंघात भाजपचे राजू शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.. आज दुपारी राजू शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक मानले जातात. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी भाजपकडून कुठेतरी आपल्याला संधी मिळावी अशी मागणी लावून धरली होती. मात्र त्यांना कुठेही उमेदवारी मिळू शकली नाही. अखेर औरंगाबाद पश्‍चिम या राखीव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. आज कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

औरंगाबाद शहरामध्ये तीन मतदारसंघ आहेत. या तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे औरंगाबाद पश्‍चिम या मतदारसंघांमध्ये होते. युतीकडून शिवसेनेचे संजय शिरसाट यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरी अटळ असल्याचं बोललं जात होतं. अखेर राजू शिंदे यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. शिंदे यांनी याअगोदर स्थायी समितीचे सभापती म्हणून काम केलेले आहे. मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर त्यांनी उपमहापौरपदावरही दावा केला होता. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. सहा महिन्यापूर्वी महानगरपालिकेतील स्थायी समितीवर पुन्हा जाण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती, मात्र त्याही ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com