औरंगाबाद पश्‍चिममधून भाजपच्या राजू शिंदेची बंडखोरी कायम

औरंगाबाद पश्‍चिममधून भाजपच्या राजू शिंदेची बंडखोरी कायम

औरंगाबाद : पूर्व, मध्यसह जिल्ह्यातील वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री मतदारसंघातील शिवसेना-भाजप बंडखोरांनी माघार घेत युतीधर्म पाळला. परंतु औरंगाबाद पश्‍चिम मधून बंड पुकारलेले भाजप नगरसेवक आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजू शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. बागडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी शेवटपर्यंत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते नॉटरिचेबल होते. 

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्ष मी निवडणूकीची तयारी करत आहे, पक्षाकडे उमेदवारी मागितली पण, मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने मला डावलण्यात आल्याचा आरोप करत भाजपच्या राजू शिंदे यांनी शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

राजू वैद्य, किशनचंद तनवाणी यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात केलेली बंडखोरी मागे घेत युतीचा प्रचार करणार असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या प्रमाणेच राजू शिंदे हे देखील माघार घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण सकाळपासून शिंदे यांच्यांशी संपर्क साधण्याचे सुरू असलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. 

राजू शिंदे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे त्यांनी युतीच्या स्थानिक व राज्य पातळीवरील कोणत्याच नेत्यांचे फोन घेतले नाही. दबाव वाढू नये म्हणून शिंदे यांनी आपला फोनच बंद केला, त्यामुळे ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटून जाईपर्यंत नॉटरिचेबलच होते. 

गायकवाडांचा अर्ज बाद झाल्याने शिंदे ठाम? 
पश्‍चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाणणीत बाद झाला होता. याचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळू शकतो याचा अंदाज आल्यामुळेच राजू शिंदे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजू शिंदे यांची उमेदवारी कायम राहिल्यामुळे आता पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संजय शिरसाट- एमआयएमचे अरुण बोर्डे आणि अपक्ष राजू शिंदे अशी तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com