सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून प्रश्‍न मार्गी लावणार : राजू शेट्टी 

'लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे. शेतकऱ्यांवर लादलेली तीस हजार कोटींची वीज बिले चुकीच्या पद्धतीने लादण्यात आली आहेत," असे सांगत याविरोधात कृषीदिनी एक जुलै रोजी कोल्हापूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून प्रश्‍न मार्गी लावणार : राजू शेट्टी 

जयसिंगपूर  : ''लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी माझे तोंड कुणी बंद करू शकत नाही. शेतकरी जगला तरच चळवळ टिकणार आहे. आता मला भरपूर वेळ असून सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता नव्या जोमाने चळवळीत सक्रिय राहावे. शेतकऱ्यांवर लादलेली तीस हजार कोटींची वीज बिले चुकीच्या पद्धतीने लादण्यात आली आहेत," असे सांगत याविरोधात कृषीदिनी एक जुलै रोजी कोल्हापूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ते म्हणाले, "भाजप शेतकरी विरोधी आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही वर्गणीचा ओघ सुरूच आहे. राजकारण हा आमचा धंदा नसून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तयार झालेली चळवळ आहे. शासनाची फसल विमा योजना फसवणूक असून राज्यातून सलग दोन वर्षे दुष्काळ असताना विमा कंपन्यांना वीस हजार कोटीचा नफा होतोच कसा? शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे.''

''कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची 31 मेअखेर 244 कोटींची एफआरपी थकीत आहे. यामध्ये भाजप, शिवसेनेचे दहा कारखाने असून त्यांचे 189 कोटी रुपये थकीत आहेत. कॉंग्रेसच्या दोन कारखान्यांचे 11 कोटी 32 लाख थकीत आहेत. खासगी तीन कारखान्यांचे 43 कोटी थकीत आहे. यात सर्वात जास्त थकीत रक्कम भाजप, शिवसेनावाल्यांची आहे. म्हणूनच मी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कारखानदारांच्या मांडीला-मांडी लावून रक्कम वसूल करायला बसलोय." असेही शेट्टी म्हणाले.

"भाजप सरकारच्या काळात गायींची हत्या केली म्हणून 50 जणांना शिक्षा देण्यात आली. मात्र, नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे चारा छावणी स्थापन केली नाही. त्यामुळे जनावरांना चारा व पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी सुमारे बाराशे जनावरे जंगलात सोडली. मागील आंदोलनात चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांची वीज बिले तपासून दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, कार्यवाही झाली नाही. तीस हजार कोटीची वीज बिले लादण्यात आली आहेत. कृषीदिनी होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी ताकद दाखवून द्यावी.'', असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

भगवान काटे, जालिंदर पाटील, भागवत नरवाडे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावकर मादनाईक, रामचंद्र शिंदे, मन्सूर मुल्लाणी, प्रा.राजाराम वरेकर, मिलिंद साखरपे, आदिनाथ हेमगिरे, सुरेश कांबळे उपस्थित होते.

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com