raju shetty vs dnyaneshwar mulye issue | Sarkarnama

IFS ज्ञानेश्‍वर मुळेंसाठी शेट्टींच्या पराभवाची जबाबदारी BJP घेणार कां? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

राज्यात भाजपविरोधात लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. सांगली व जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाली म्हणून भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही.

- राजू शेट्टी, खासदार  

सातारा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात आयएफएस अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या नावाची चर्चा आहे. दहा वर्षापुर्वी स्वत: शेट्टी लोकसभेची उमेदवारी घ्या म्हणून ज्ञानेश्‍वर मुळे यांच्याकडे गेले होते, मात्र आता 10 वर्षानंतर मुळे हे शेट्टींच्या विरोधात निवडणूक लढू शकतात, पण त्यासाठी त्यांना विजयाची खात्री कोण देणार, हा कळीचा सवाल आहे. 

साताऱ्यात यासंबंधाने राजू शेट्टी यांनी विचारण्यात आले. मुळे यांच्या उमेदवारीसंदर्भात शेट्टी म्हणाले, ज्ञानेश्‍वर मुळेंना दहा वर्षापूर्वी मी लोकसभेची निवडणुक लढा असे सांगितले होते. पण त्यांच्या पत्नीने ते निवडुन येतील, याची गॅरंटी मागितली होती. राजकारणात अशी कोणतीही गॅरंटी नसते, आता परिस्थिती बदलली आहे. 
भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर तुम्ही माघार घेणार का, यावर श्री. शेट्टी म्हणाले, यावेळेस मी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख