Raju Shetty is unhappy over being neglected at swearing in ceremony | Sarkarnama

राजू शेट्टींचा रोख कोणावर?

सरकारनामा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

राजू शेट्टींचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. 

मुंबई  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ट्विटरवर # व्वा जानते राजे... !  असा हॅशटॅग वापरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांचा रोख कोणावर आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

राजू शेट्टी यांनी एक तासाभरापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, ज्यांनी ईडी, इन्कम टॅक्‍स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण ! आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःचे नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटक पक्ष मात्र बेदखल. # व्वा जानते राजे ... ! 

 

 

राजू शेट्टी हे भाजपची संगत सोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सहभागी झालेले होते. विधानसभा निवडणुकीतही ते कॉंग्रेस आघाडी बरोबर होते. असे असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेशी आघाडी करून सत्ता संपादन केली आहे. राज्यमंत्रीमंडळाची स्थापना करताना राजू शेट्टी यांना मंत्री करावे अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मात्र राजू शेट्टींचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर राजू शेट्टी यांनी आजच्या शपथविधीला आघाडीतील घटक पक्षांना सन्मानाने बोलावले नाही, यावरून ट्‌विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांचा टीकेचा रोख कोणाविरुद्ध आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख