raju shetty on sharad pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

राजू शेट्टी म्हणतात, "शेतकऱ्यांची खरी जाण शरद पवारांना'! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 एप्रिल 2017

शरद पवार यांनी राजू शेट्टी यांची जात काढल्याचा विषय काही वर्षापूर्वी गाजला होता. शेट्टींना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीने जंगजंग पछाडले. या पार्श्‍वभूमीवर, तसेच स्वतः:चा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखालील काम करत असतानाही शेट्टींनी हे धाडसी मत व्यक्‍त केले आहे. 

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सर्वांत कठोर टीकाकार म्हणून ओळख असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी "शरद पवार हे शेतकऱ्यांची खरी जाण असणारे नेते' असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हटले आहे. भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न चालवले असतानाच शेट्टी यांनी हे मत नोंदविल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

परिवर्तन युवा परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांतून शेट्टींना प्रश्‍न विचारण्यात आला, "शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची खरी जाण कोणाला आहे, मोदींना की शरद पवारांना' ? उत्तरादाखल शेट्टी यांनी पवारांचे नाव घेताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शेट्टी पुढे म्हणाले,"पवार सत्तेत असताना बारामतीत जाऊन आम्ही आंदोलने केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातही आंदोलन केले. नरेंद्र मोदी यांनी चुकीचे निर्णय घेतले तर त्यांच्या गावातही आंदोलन करू. मी सत्तेत असलोतरी सत्तेचा गुलाम नाही.' 

राजकारण ही गटारगंगा आहे असे म्हटले जाते. जर गटारगंगा असेलतर त्यात हात घालून साफ करण्याची तयारी युवकांनी ठेवली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख