राजू शेट्‌टी- संजयकाकांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली!

राजू शेट्‌टी- संजयकाकांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली!

सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्‌टी आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील आज अचानक एकमेकांच्या समोर आल्यावर त्यांनी चक्क गळाभेट घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील या दोन खासदारांच्या गळाभेटीने चांगलीच चर्चा रंगली. 
हातकणंगले मतदार संघाचे खासदार राजू शेट्‌टी आज सांगलीत आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक तारखेला परिषद आयोजित केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार बैठक बोलवली होती. माधवनगर रोडवरील सर्किट हाऊस येथे ते बैठकीसाठी आले असताना खासदार संजयकाकाही तेथे आले. खा. शेट्‌टी तेथे असल्याचे समजताच संजयकाकांनी त्यांची भेट घेतली. केवळ हस्तांदोलन नाही तर गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. 

चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी भाजपशी जुळवून घेणारे खासदार राजु शेट्‌टी सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका करत आहेत. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन सरकारविरोधी मोर्चेही काढले. त्यामुळे त्यांनी भाजपचे खासदार संजयकाकांची घेतलेली गळाभेट उपस्थितांच्या भुवया उंचावणारी होती. शिवाय माध्यमांनाही "खाद्य' म्हणून त्यांनी फोटोसाठी गळाभेटीची पोझही दिली. यावेळी खा. शेट्‌टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परिषदेचे निमंत्रणही खासदार संजयकाकांना दिले. या भेटीचा फोटो वेगाने सोशल मिडियावर व्हायरलही झाला आणि राजकारणावर गप्पा मारणाऱ्यांना एक चांगलाच विषय चघळायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com