raju shetty prefers indrjit deshmukh for sangali | Sarkarnama

...तर सांगलीत इंद्रजित देशमुख हे आमचे उमेदवार : राजू शेट्टी

संतोष शेंडकर
गुरुवार, 7 मार्च 2019

सोमेश्वरनगर : राजकारण दुर्जनानी भरलेले आहे. त्यापेक्षा सांगली मतदारसंघ जर जागावाटपात आघाडीकडून मिळाला तर इंद्रजित देशमुख हेच आमचे उमेदवार असतील. गटारगंगा साफ करण्यासाठी सज्जन व्यक्तीची राजकारणात गरज आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. तसेच रवीकांत तुपकर हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याच्या चर्चेचा त्यांनी इन्कार केला.

निंबुत (ता. बारामती) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्याच्या जलस्वराज विभागाचे माजी उपायुक्त इंद्रजित देशमुख यांचा स्वाभिमानी गांभीर्याने विचार करत असल्याचे शेट्टीनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. स्वच्छ व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा होता. राज्यभर सामाजिक व आध्यात्मिक कामातून ते युवक वर्गात लोकप्रिय आहेत. सांगली व साताऱ्यात त्यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यांचे वडील दत्ताजीराव देशमुख माजी आमदारही होते.

याबद्दल शेट्टी म्हणाले, जागावाटपात आघाडीकडे हातकणंगले, माढा, बुलढाणा, वर्धा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघाची मागणी केली आहे. किमान तीन जागांवर आम्ही आग्रही आहोत. हातकणंगले त्यांनी सोडलाच आहे. वर्धा, माढाऐवजी त्यांनी सांगली मतदारसंघ जागावाटपात दिला तर इंद्रजित देशमुख निश्चित आहेत.

गटारगंगा साफ करण्यासाठी सज्जनानी नेभळटपणा सोडून राजकारणात येणे आवश्यक आहे असे आमच्या पक्षाचे म्हणणे आहे. राजकारण स्वच्छ करणे आवश्यक आहे. देशमुख सज्जनपणात फिट बसतात. सिंदखेडराजा मतदारसंघ स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी मागितल्याचा त्यांनी इन्कार केला. असं काही ठरले नाही, असे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख