raju shetty nivedita mane report | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

हेवीवेट राजू शेट्टींसमोर माने माय-लेकरं शिवधनुष्य पेलणार ?

सदानंद पाटील
रविवार, 16 डिसेंबर 2018

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने आणि त्यांचे पूत्र धैर्यशील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना किती फायदा होतो याची चर्चा हातकणंगले मतदारसंघात सुरू आहे. खरेच ही मायलेकरं वजनदार (हेवीवेट) राजू शेट्टींना आव्हान देतील का ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

धनुष्यबाण हातात घेताना निवेदिता माने म्हणाल्या की तसे राष्ट्रवादी सोडण्याचे कारण मोठे नव्हते. याचा अर्थच असा होतो अर्थात राजू शेट्टी. शेट्टी हे "एनडीए'तून बाहेर पडल्यानंतर या मतदारसंघाची समीकरणेच बदलली. भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे शेट्टी हे गेल्या चार वर्षापासून सातत्याने शेतकरी प्रश्‍नावर मोदी सरकारवर हल्ले चढवित आहेत आणि तेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला हवे होते.

इकडे शेट्टींसारखा नेता मिळाल्याने दोन्ही कॉंग्रेस नेते आनंदी होते मात्र शेट्टी यांच्या कट्टर विरोधक निवेदिता माने नाराज होणे स्वाभाविक होते. शेवटी जे व्हायचे तेच झाले आणि या मायलेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

1999 आणि 2004 दरम्यान निवेदिता माने या मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार होत्या. तसेच अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा होत्या. पक्षाने त्यांच्यावर आतापर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश असला तरी यापूर्वीही एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 

माने यांचे पुत्र धैर्यशील यांनीही काही दिवसांपूर्वी खांद्यावर भगवा घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या माय-लेकरावर टाकलेला विश्वास ते किती सार्थकी लावतात, याची चर्चा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. 

आताचा हातकणंगले म्हणजेच पूर्वीच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदारम म्हणून बाळासाहेब माने यांनी प्रतिनिधीत्व केले. ते 1977 ते 1991 असे सलग पाच वेळा खासदार होते. त्यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.त्यानंतर त्यांच्या स्नुषा निवेदिता माने या 1999 व 2004 ते 2004 ते 2009 दरम्यान सलग दोन वेळा त्या खासदार बनल्या. 

मात्र त्यांना 2009 च्या निवडणुकीत त्या शेट्टीकडून पराभूत झाल्या. 2014 मध्येही त्यांनीच बाजी मारली. आता 2019 मध्ये शेट्टी यांच्यासमोर कोणाचे आव्हान असेल याकडे केवळ कोल्हापूरचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खा. शेट्टी हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. 

निवेदिता माने यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत ना सहकारी संस्थाचे जाळे उभारले ना त्यांना शिरोळपासून शाहूवाडी, वाळव्या पर्यंतचा कार्यकर्त्यांचा समूह कायमपणे पाठीशी ठेवता आला. याच काळात त्यांनी एकवेळ शिवसेना प्रवेश करूनही राजकिय भवितव्य अवलंबून पाहण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेल्या माने यांना राजकारणात अच्छे दिन आले. मात्र 2009 च्या निवडणुकीत शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी फार उभारी घेतली नाही. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत माने यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना डावलून ही जागा कॉंग्रेसच्या कलाप्पांना आवाडे याना देण्यात आली. माने याना या बदल्यात विधान परिषद सदस्य करण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र तो शब्द नेत्यांनी पाळला नाही. यावेळीही त्यांनी पूत्र धैर्यशील माने याना उमेदवारी मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ शेट्टी याना सोडण्याचा निर्णय घेतल्याने माने यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला. 

आज शिवसेना- भाजपा युतीबाबत वाटाघाटी सुरू आहेत.कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे राहील याची शाश्वती नाही. त्यातूनही तो शिवसेनेकडे राहिला तरी धैर्यशील यांना उमेदवारी मिळेल याची गॅरंटी नाही. कारण युती झाल्यास शिवसेनेकडून आमदार उल्हास पाटील यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे आणि भाजपही त्यांच्या नावासाठी आग्रही आहे. 

जरी माने यांना उमेदवारी मिळाली तरी आज या लोकसभा मतदारसंघात माने यांच्या गटाची ताकद किती ? हा प्रश्नच आहे. धर्यशील माने याना जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीला निवडून आणता आले नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अपयशाचे आणि अपेक्षांचे ओझे घेऊन माय-लेकरांना या निवडणुकीत उतरावे लागणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख