raju shetty on milkrate in wathar station | Sarkarnama

25 रुपये दरही शेतकऱ्यांना परवडत नाही : राजू शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) : राज्य शासनाने 21 जुलैपासून दुधाच्या दरात वाढ करून लिटरला 25 रुपये दर जाहीर केला आहे. हा दर न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थीदिवशी पुन्हा रस्त्यावर येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

आंदोलनातून शेतकऱ्यांना दूध दर वाढवून मिळाल्याबद्दल खासदार शेट्टी यांचा वाठार स्टेशन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राजू शेळके, ऍड. योगेश पांडे, प्रमोद चव्हाण, बाळासाहेब देशमुख, बापूसाहेब कारंडे, नितीन यादव, जीवन शिर्के, श्रीकांत लावंड उपस्थित होते. 

खासदार शेट्टी म्हणाले, "आज दुधाला मिळत असलेला 25 रुपये दरही शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र, महाराष्ट्रात दररोज 20 ते 22 लाख लिटर दुधाचे गरजेपेक्षा जास्त उत्पन्न आहे. कर्नाटक सरकार तेथील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देते. त्याचप्रमाणे राज्य शासनाने येथील शेतकऱ्यांना थेट अनुदान दिल्यास येथील शेतकरी बाहेरून येणाऱ्या दूध उत्पादकांशी स्पर्धा करू शकेल.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख