राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा: शेट्टी 

शासनाने मृत जनावरांसाठी तुटपुंजी मदत दिली आहे. ही मदत वाढवली पाहिजे.
राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा: शेट्टी 

कोल्हापूर : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिक गेलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. वीज पंपाची बिले माफ करावीत. कर्जमाफीचे परिपत्रक तत्काळ काढावे, तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे या मागणीसाठी मंगळवारी (ता. 28) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिली. 

कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला 2500 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणीही श्री शेट्टी यांनी केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

माजी खासदार शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक ऐवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. 1 ऑगस्टमध्ये धरण रिकामी केली असती तर आता पुराची परिस्थिती ओढवली नसती. राज्य शासन आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे. जिल्ह्यात शंभर वर्षात कधी येवढा पाऊस पडला नसेल तेवढा पाऊस यावर्षी झाला आहे. 12 पट पाऊस जास्त झाला आहे. याचा अंदाज कोणलाही आला नाही. हे सरकारचे अपयश आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात झालेली ही आपत्ती राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली पाहिजे. शिरोळमध्ये संपूर्ण शेती गेली आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगही पाण्यात बुडाला आहे. याला तत्काळ मदत जाहीर केली पाहिजे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com