सफरचंद उत्पादकांच्या मदतीसाठी शेट्टी निघाले काश्‍मीरला

जवळपास 20 लाख टन सफरचंदाचे उत्पादन झाले असून, सुमारे 20 हजार कोटींचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्‍त करत आहेत.
सफरचंद उत्पादकांच्या मदतीसाठी शेट्टी निघाले काश्‍मीरला

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी 13 ते 15 नोव्हेंबरपर्यंत जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर जात आहेत. काश्‍मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. या शेतकऱ्यांचे 20 लाख टन सफरचंद विक्री न झाल्याने खराब होत चालली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे सदस्य या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये 370 कलम रद्द केल्याने अनेक महिन्यांपासून अतिदक्षतेची परिस्थिती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सफरचंदांचे उत्पादन झाले असताना त्याची विक्री होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या परिस्थितीत मदत करण्याच्या उद्देशाने संबंधित शेतकऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पत्रव्यवहार केला. काश्‍मीर येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने खरेदी केंद्रे सुरू करण्याची आणि हमीभावाने शेतकऱ्यांच्या बांधावरून सफरचंद खरेदीची मागणी केली. मात्र, यावर काहीच कारवाई झाली नाही. जवळपास 20 लाख टन सफरचंदाचे उत्पादन झाले असून, सुमारे 20 हजार कोटींचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्‍त करत आहेत. 

अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीचे शिष्टमंडळ बुधवारी (ता. 13) काश्‍मीरला रवाना होणार आहे. या दौऱ्यात ते स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. तोडगा काढण्यासाठी ते काश्‍मीरच्या राज्यपालांचीही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात राजू शेट्टी यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंह, स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव, प्रेमसिंह गेहलावत, कृष्णप्रसाद पद्मनाभमन, अखिल भारतीय मजदूर संघटनेचे महासचिव पी. सत्यवान आदींचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com