जानकर, आठवलेंना योग्यवेळी महाविकास आघाडीत आणणार!

भाजपमधील वागणुकीची मुंडे समर्थकांची जखम तशी जुनीच आहे. हीच जुनी जखम आज भळभळू लागली आहे.
raju shetty focus on bjp allies
raju shetty focus on bjp allies

सोलापूर : भारतीय जनता पार्टीत कै. गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. कै. मुंडे यांच्या बाबतीत भाजप जशा पद्धतीने वागत होते तशाच पद्धतीने आज मुंडे समर्थकांना भाजपमध्ये वागणूक मिळत आहे. भाजपमधील वागणुकीची मुंडे समर्थकांची जखम तशी जुनीच आहे. हीच जुनी जखम आज भळभळू लागली असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज सोलापुरात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्याशी कधी माझं बोलणं होत नाही परंतु माजी मंत्री महादेव जानकर, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, विनायक मेटे यांच्याशी माझे आजही अधून-मधून बोलणे होते. माझ्या या जुन्या मित्रांना योग्य वेळी महाविकास आघाडीत मी घेऊन येईल अशी माहितीही शेट्टी यांनी दिली. 

नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 11 जानेवारीपर्यंत सर्व नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडी केल्या जातील. 11 फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. 

बाजार समित्यांमध्ये दोष आहेत. दोष आहेत म्हणून बाजार समित्याच बरखास्त करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्या सारखे आहे. ई-नाम आणि नवीन तंत्रज्ञानाला आम्ही कधीच विरोध केला नाही. ई-नाम राबविण्याची बाजार समित्यांची क्षमता आहे का? याचाही अभ्यास करावा. ई-नाममध्ये लहान शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी मिळणार? याबद्दलही विचार झाला पाहिजे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com