Raju Shetty donates 1 million for Maratha bhavan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांची तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या दत्ता बहिरटांची आघाडी
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

 मराठा भवन बांधकामासाठी राजू शेट्टी यांच्याकडून 10 लाखांचा निधी

सरकारनामा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

इचलकरंजी: रुई (ता.हातकणंगले) येथील मराठा समाज भवन बांधकामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी 10 लाख रुपयांचा निधी आज जाहीर केला. त्याच्या प्रशासकीय मंजुरीबाबतचेे पत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ पाठवित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाकडून भवन बांधकामासाठी निधी मागणीबाबतचे निवेदन आज (रविवारी) खा. शेट्टी यांना त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले. त्यानंतर खासदारांनी समाजाची मागणी पूर्ण करीत 10 लाखांचा निधी दिल्याने समाजाच्या वतीने अभिनंदन करुन त्यांना धन्यवाद देण्यात आले. यापुढील काळात आणखी निधी देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, हातकणंगले तालुका मराठा समाज समन्वय समितीचे सचिव भाऊसाहेब फास्के  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष कुमार जगोजे, सचिव महादेव शिंदे, खजिनदार सुभाष पाटणकर, संजय शिंदे, कुमार किल्लेदार, शिवाजी झपाटे, अमोल सुर्वे,अभिषेक अपराध, सुकुमार काश्मिरे, प्रमोद शेटाणे आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख