१४ एप्रीलनंतर ग्रामीण भागातील लाॅकडाऊन उठवा : राजू शेट्टी

चौदा एप्रिलनंतर ग्रामीण महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे
Raju Shetty Demands Lifting of Lock Down in Rural Maharashtra after 14th April
Raju Shetty Demands Lifting of Lock Down in Rural Maharashtra after 14th April

पुणे : ''चौदा एप्रिलनंतर ग्रामीण महाराष्ट्रातील लॉकडाऊन उठवा."अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. "ग्रामीण भागातील लोक कोरोनाच्या बाबतीत जागृत आहेत.ते खूप काळजी घेत आहेत. डोळ्यात तेल घालून गावाची राखण करत आहेत."असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"कोरोनाच्या बाबतीत ग्रामीण भागातील लोक खूप काळजी घेत आहेत.आतापर्यंत जे  रुग्ण आढळून आलेले आहेत ते खेड्यातील आहेत काय?. ग्रामीण भागातील लोक सरकार आणि आरोग्य यंत्रणा जे सांगत आहे.त्याचे पालन करत आहे. जे लोक बाहेरून आलेले आहेत. त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था गावोगावी केलेली आहे.एखादा परका माणूस जरी गावात आला तर लगेच जागरुकतेने त्याची चौकशी केली जात आहे. बाहेरून एकही माणूस गावात येऊ दिला जात नाही.डोळ्यात तेल घालून खेड्यातील लोक गावावर लक्ष ठेवून आहेत.यानिमित्ताने गावगाड्यात एकी निर्माण झाली आहे.काहीही करून आपल्या गावाला कोरोनापासून वाचवायचे असा निर्धार गावातील लोकांनी केला आहे."

"लॉकडॉऊन मुळे गावगाड्यावर परिणाम झाला आहे.छोट्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.सांगली जिल्ह्यात २५ रुग्ण सापडले आहेत ते एकाच कुटुंबातील आहेत मग सगळ्या जिल्ह्याला का वेठीस धरायचे? कोल्हापुरात दोन आहेत त्यांच्यासाठी जिल्ह्याला का वेठीस धरायचे? त्यामुळे संचारबंदी सुरू ठेवावी, मात्र लॉकडाऊन उठवावे. लॉकडाऊन उठवताना इतर गावातून त्या गावात कोणत्याही माणसाला प्रवेश देऊ नये" असे शेट्टी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com